shankarrao gadakh Saam TV
मुंबई/पुणे

गडाख कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ; धमकीच्या निषेर्धात नेवाश्यात मुकमोर्चा

व्हायरल झालेली ऑडिओ क्लिपबाबत तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

गोविंद साळुंके, सचिन अगरवाल

नगर : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (shankarrao gadakh) यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान गडाख यांच्या कुटुंबियांना धमकी देणा-यांचा निषेध करण्यासाठी तसेच आराेपींचा लवकरात लवकर तपास करावा या मागणीसाठी आज (बुधवार) नेवासा तालुक्यातील नेवासा (nevasa) , कुकाणा, सोनई, घोडेगाव, वडाळा, चांदा या गावातून मुक मोर्चा (morcha) काढण्यात आला. (shankarrao gadakh latest marathi news)

दोन दिवसांपुर्वी शंकरराव गडाख आणि त्यांचे चिरंजीव उदयन गडाख (udayan gadakh) यांना जीवे मारण्याची धमकीचा संवाद असलेली ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाली होती. याची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून राहुल राजळेंवरील हल्ल्याचा आणि व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपचा संबध आहे का? याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

शंकरराव गडाख यांचे स्वीय साहाय्याक राहुल राजळे यांच्यावर शुक्रवारी प्राणघातक हल्ला झाला होता. राहुल राजळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या नितीन शिरसाठला पोलिसांनी शेवगाव बस स्थानकावरून ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान याच प्रकरणातील संतोष भिंगारदिवे या दुसऱ्या संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (local crime branch) पुणे जिल्ह्यातील धानोरी (dhanori) येथुन ताब्यात घेतलं आहे. व्हायरल झालेली ऑडिओ क्लिपबाबत (viral audio clip) तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

दरम्यान मंत्री गडाख व त्यांचे पुत्र उदयन यांना घरात घुसून गोळ्या घालू अशी धमकी देण्यात आल्याने या गंभीर घटनेचा निषेध म्हणून आज संपुर्ण नेवासा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. आज गावात निषेध सभा झाली. संतप्त ग्रामस्थ व युवकांनी पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. याबराेबरच नेवासा तालुक्यातील नेवासा, कुकाणा, सोनई, घोडेगाव, वडाळा, चांदा या गावातून मुकमोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

morcha in nevasa

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT