Satara: ‘शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान’ प्रेरणादायी ठरेल : वृषालीराजे भोसले

‘शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान’ तरुण पिढीला नक्की प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वासही वृषालीराजे भोसले यांनी व्यक्त केला.
vrushaliraje bhosale
vrushaliraje bhosalesaam tv

सातारा : करंजे - म्हसवे मार्गावरील अग्निमंदिर परिसरात ‘शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान' उभारण्यात येणार असल्याची माहिती श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज सेवाधामच्या अध्यक्षा वृषालीराजे भोसले (vrushaliraje bhosale) यांनी येथे (satara) दिली. त्याचे भूमिपूजन येत्या दाेन मे रोजी सायंकाळी चार वाजता अक्कलकोट (शिवपुरी) विश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष प. पू. डॉ. पुरुषोत्तम ऊर्फ राजाभाऊ महाराज यांच्या हस्ते माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसले आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. संभाजीराव पाटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हाेईल असे वृषालीराजे भाेसले यांनी नमूद केले. (vrushaliraje bhosale latest marathi news)

vrushaliraje bhosale
Satara: मराठवाड्याप्रमाणे जिल्ह्यात तुर पिक लागवडीवर भर द्या : बाळासाहेब पाटील

वृषालीराजे म्हणाल्या शिवकार्य पुढे न्यावे अशी मातोश्री चंद्रलेखाराजे यांची इच्छा होती. सातारा ही स्वराज्याची चौथी राजधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीने शिवरायांचे अनेक पराक्रम पाहिले. या भूमीत अनेक नररत्ने निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी इतिहास अभ्यासक, संशोधक, शिवप्रेमींशी चर्चा करुन सातारा शहराजवळील करंजे येथील करंजे-म्हसवे मार्गावर अग्निहोत्र मंदिर परिसरात ‘शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान’ साकारण्याचा मानस आहे.

या स्फूर्तीस्थानात शिवरायांचे पराक्रम व त्यांच्या जीवनातील काही महत्वपूर्ण घटना म्यूरल्सच्या माध्यमातून चितारण्याचा प्रयत्न आहे. त्यामध्ये राजमाता जिजाऊ-शिवराय (शिवनेरी), स्वराज्य प्रतिज्ञा, प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका, शिवराज्याभिषेक अशा निवडक प्रसंगांचा समावेश असेल.

या स्फूर्तीस्थानाला भेट देणार्‍या शिवप्रेमींना शिवरायांचे जीवनकार्य 3 डी चित्रफितीद्वारे पहायला मिळेल अशी व्यवस्था केली जाणार आहे. या स्फूर्तीस्थानाची मांडणी ऐतिहासिक असेल. शिवरायांचा जीवनपट मांडणारे पहिले स्फूर्तीस्थान राजधानी सातारा येथे उभारले जात आहे, याचा आनंद होत आहे. ‘शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान’ तरुण पिढीला नक्की प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वासही वृषालीराजे भोसले यांनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

vrushaliraje bhosale
Udayanraje Bhosale: पुणे- सातारा- कराड रेल्वेची शटल सेवा सुरु करा : उदयनराजे भाेसले
vrushaliraje bhosale
Satara: माजी आमदार मदन भाेसले गटास धक्का; चाैघांचा NCP त प्रवेश
vrushaliraje bhosale
Satara: शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढवा; राजधानी साता-यात वृषालीराजे आक्रमक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com