Satara: मराठवाड्याप्रमाणे जिल्ह्यात तुर पिक लागवडीवर भर द्या : बाळासाहेब पाटील

शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
balasaheb patil
balasaheb patil saam tv

सातारा : यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खरीप हंगामात (kharif season) शेतकऱ्यांसाठी (farmers) लागणारा खतांचा तसेच बि-बियाणांचा तुटवडा भासणार नाही. याबरोबरच बोगस खतांची व बि-बियाणांची विक्री होणार नाही याची दक्षता कृषी विभागाने (agriculture department) घ्यावी अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील (balasaheb patil) यांनी येथे (satara) अधिका-यांना दिल्या. (balasaheb patil latest marathi news)

साता-याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात खरीप हंगाम -२०२२ पुर्वतयारी आढावा बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मंत्री पाटील बोलत होते. या बैठकीस खासदार श्रीनिवास पाटील (shrinivas patil), आमदार पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan), आमदार महादेव जानकर (mahadev jankar), आमदार अरुण लाड (arun lad), जिल्हाधिकारी शेखर सिंह (shekhar sinh), मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सह संचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी होते. सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी बियाणांसाठी जतन केलेले बियाणे विकले आहेत. सोयाबीन बियाणांचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी कृषी विभागाने घ्यावी. मराठवाड्यात तुर पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. त्याच पद्धतीने जिल्ह्यातही तुर पिक लागवड वाढविण्यावर कृषी विभागाने भर द्यावा. यासाठी जनजागृती करावी असे आवाहन पाटील यांनी केले.

balasaheb patil
Pandharpur Wari: पायी वारीचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी येणार 'माऊली' गावात

कोरोना काळात कृषी विभागाने बांधावर जावून बियाणांची उगवन क्षमता या विषयी कृषी प्रात्यक्षिके घेतली होती. अशा प्रमाणेही शेतकऱ्यांच्या बांधावर प्रात्यक्षिके घ्यावीत. तसेच खातांचा व बियाणांचा बोगस पुरवठा होणार नाही यासाठी भरारी पथके तैनात करुन कृषी दुकानांची वेळोवेळी तपासणी करावी. तसेच कोणत्या गावात किती ऊसाची लागवड आहे याची नोंद ठेवा, अशा सूचना करुन खरीप हंगाम २०२२ यशस्वी करा, असेही पालकमंत्री पाटील यांनी नमूद केले.

खासदार पाटील यांनी सेंद्रीय मालाला बाजार पेठेत चांगला दर मिळत आहेत. तरी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे असे आवाहन केले. आमदार चव्हाण यांनी शेतमालाचे उत्पादन वाढवायचे असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण झाले पाहिजे. यासाठी प्रत्येक तालुक्यात एक माती परीक्षण प्रयोगशाळांची निर्मिती केली पाहिजे असे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

balasaheb patil
Satara: राजकीय परिस्थिती बदलली अन् मकरंद पाटलांनी डाव साधला : मदन भाेसले
balasaheb patil
Satara: माजी आमदार मदन भाेसले गटास धक्का; चाैघांचा NCP त प्रवेश
balasaheb patil
Breaking: लाकडी वस्तू बनविण्याच्या गाेदामास लागली आग; Fire Brigade दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com