School Saam Tv
मुंबई/पुणे

School Education: सरकारी शाळेचा खर्च फक्त ३ हजार, खासगी शाळांनी केला खिसा रिकामा, NSS सर्वेक्षणाचे आकडे वाचून धक्का बसेल

School Education Fees In 2025: शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे. शिक्षणासाठी खाजगी शाळांमध्ये हजारो रुपये मोजावे लागतात,असं एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Siddhi Hande

शिक्षण हा सर्वांचा मूलभूत अधिकारी आहे.शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणाने सर्वकाही बदलण्याची ताकद आहे. परंतु शिक्षणाचा खर्च सध्या खूप जास्त महागला आहे. भारतात प्रत्येक राज्यात शिक्षण हा केवळ मूलभूत अधिकार न राहून खर्चामध्ये शर्यत ठरला आहे. शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस वाढतच आहेत, नुकताच राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या ८०व्या फेरीत शिक्षण सर्वेक्षण करण्यात आले.

सर्वेक्षणात काय लिहलंय?

या व्यापक मॉड्युलर शिक्षण सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात शिक्षणाचा खर्च वाढत आहे. दरम्यान, सरकारी शाळेत मुलाला घातले तर त्याचा वार्षिक खर्च फक्त ३००० रुपये आहे. जर विद्यार्थ्यांना विनाअनुदातीत शाळेत घातले तर तोच खर्च २८,७४१ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे पालकांच्या खिशावार मात्र, ताण येत आहे.

सर्वाधिक विद्यार्थी सरकारी शाळेत

या सर्वेक्षणाअंतर्गत भारतातील ५२,०५८ कुटुंबे आणि ५७,७४२ विद्यार्थ्यांकडून माहिती गोळा करण्यात आली. यामध्ये देशभरातली एकूण विद्यार्थ्यांपैकी ५५.९ टक्के विद्यार्थी सरकारी शाळेत जातात. त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.

सध्याच्या चालू आर्थिक वर्षात सरकारी शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणावर होणारा खर्च सरासरी २,८६३ रुपये आहे. तर विनाअनुदातील शाळेतील खर्च २५,००२ रुपये आहे. हा खर्च खूपच जास्त आहे. सर्व शाळांमध्ये सध्या सर्वाधिक खर्च अभ्यासक्रम खर्चावर होत आहे. हे शुल्कत ७,१११ रुपये आहे. तर पाठ्यपुस्तके आणि स्टेशनरीवर २,००२ रुपये खर्च झाला. शहरी भागातील लोक यासाठी जास्त पैसे देत आहेत. अभ्यासक्रम शुल्कावरील सरासरकी कऱ्च १५,१४३ रुपये आहे. तर हाच खर्च ग्रामीण भागात ३,९७९ रुपये आहे.

महाराष्ट्रात शिक्षणावर खर्च किती? (Maharashtra Education Fees)

महाराष्ट्रात कोर्स फीवर सरासरी ११,५७६ रुपये खर्च आहे. वाहतूकीसाठी ६,६४० रुपये खर्च तर वह्या पुस्तकांसाठी २,१३२ रुपये खर्च लागतो. युनिफॉर्मसाठी १,५४५ रुपये तर इतर खर्च ९३४ रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane: मोठी बातमी! नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?

Nanded Accident : गणेश भक्तांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ३ जण जागीच ठार

Mumbai Konkan Ro Ro Ferry : तळकोकणात पोचा अवघ्या पाच तासात; आता मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा, VIDEO

Numerology: सप्टेंबर महिना 'या' मूलांकासाठी ठरेल लकी, स्वप्न होतील पूर्ण

Netflix Trending Films: नेटफ्लिक्सवर ट्रेंड होताहेत 'हे' सुपरहिट चित्रपट; भारतीय सिनेमाचांही समावेश, वाचा यादी

SCROLL FOR NEXT