Education Loan: आता एज्युकेशन लोनसाठी बँकेत जाण्याची झंझट मिटली, फक्त १५ दिवसात मिळणार कर्ज

Education Loan Online Process: अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घेतात. आता तुम्हाला फक्त १५ दिवसातच एज्युकेशन लोन मिळणार आहे.
Education Loan
Education LoanSaam Tv
Published On

उच्च शिक्षणासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. हा खर्च सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारा नसतो. त्यामुळे एज्युकेशन लोन हा एक पर्याय असतो.एज्युकेशन लोनमध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी लोन दिले जाते. दरम्यान, आता एज्युकेशन लोनची प्रक्रिया फक्त १५ दिवसांत पूर्ण होणार आहे. अर्थ मंत्रालयाने एज्युकेशन लोनसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Education Loan
SBI Home Loan: खुशखबर! होम लोन झालं स्वस्त, स्टेट बँकेचा मोठा निर्णय! तुमचे किती रुपये वाचणार?

अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना (PSBs) शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया अजून जलद करण्याचे निर्देश दिले आहे. याचसोबत मंत्रालयाने बँकांना क्रेंदीकृत क्रेडिट प्रणाली तयार करण्यास सांगितले आहे. यामुळे बँकादेखील विद्या लक्ष्मी पोर्टलशी जोडल्या जात आहेत.

आता १५ दिवसांत मिळणार एज्युकेशन लोन

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या सुचनेनुसार, बँका शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया जलद करत आहेत. सरकारने सार्वजनिक बँकांना शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. सध्या विद्यार्थ्यांना १ महिनाभर वाट पाहावी लागते. दरम्यान, जर कोणत्याही कारणासाठी कर्ज नाकारले गेले तर ते वरिष्ठ अधिकारीच मंजूर करु शकतात. याबाबतची माहिती अर्जदारासोबत शेअर करावी लागणार आहे.

शैक्षणिक कर्जावरील व्याजदर

सध्या देशातील खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील बँका ७ ते १६ टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज देत आहे. ग्रामीण बँकांमध्ये ८.५० ते १३.६० टक्क्यांनी कर्द दिले जात आहे. देशात शिक्षण घेण्यासाठी ५० लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते तर परदेशात अभ्यासक्रम करण्यासाठी १ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे. हे कर्ज पदवी, पदव्युतर अभ्यासक्रमांसाठी दिले जाते. हे कर्ज तुम्ही १५ वर्षांच्या कालावधीत परतफेड करता येते.

Education Loan
National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

विद्या लक्ष्मी योजना

सरकारची एज्युकेशन लोनसाठी विद्या लक्ष्मी योजना आहे. या योजनेत तुम्हाला एज्युकेशन लोन मिळते. यामध्ये तुम्ही एकाच ठिकाणी विविध बँकांककडून घेतलेल्या कर्जाबद्दल माहिती मिळवू शकतात. तुलनादेखील करु शकतात आणि अर्जदेखील करु शकतात.

Education Loan
Free Mobile Scheme: केंद्र सरकार देणार मोफत स्मार्टफोन? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com