Siddhi Hande
राज्यातील सर्वात तरुण आणि उच्चशिक्षित मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना ओळखले जाते.
देवेंद्र फडणवीसांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी झाला आहे. ते राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचे शालेय शिक्षण नागपूर येथे झाले.
देवेंद्र फडणवीसांनी नागपूर शंकर नगर चौक येथील सरस्वती विद्यालयातून घेतले आहे.
त्यांनी नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयातून पाच वर्षांची लॉ पदवीसाठी अॅडमिशन घेतले. त्यांनी १९९२ मध्ये लॉ पदवी प्राप्त केली.
देवेंद्र फडणवीस यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
देवेंद्र फडणवीसांनी डीएसई बर्लिन संस्थेतून डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट डिप्लोमा केला.
देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली.
देवेंद्र फडणवीस वयाच्या फक्त २२ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर होते.