PM Modi Education: पीएम मोदींच्या ग्रॅज्युएशन डिग्रीबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, CIC चा आदेश रद्द

PM Modi Graduation Degree Case: दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्य माहिती आयोगाचा आदेश रद्द केलाय. न्यायालयाच्या आदेशानुसार, पंतप्रधान मोदींचे शैक्षणिक रेकॉर्ड आणि पदव्या उघड करणे बंधनकारक नाही.
PM Modi Graduation Degree Case
Delhi High Court cancels CIC order on PM Modi’s graduation degree case.Saam Tv
Published On
Summary
  • दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी पदवीबाबत CIC चा आदेश रद्द केला.

  • मोदींचे शैक्षणिक रेकॉर्ड उघड करणे बंधनकारक नसल्याचा निर्णय.

  • CIC ने मोदींच्या ग्रॅज्युएशन डिग्रीची माहिती द्यावी असा आदेश दिला होता.

  • या निर्णयामुळे मोदी पदवी प्रकरणातील वाद शमण्याची शक्यता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षण आणि पदवीवरून मोठा गदारोळ झाला होता. विरोधकांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या शिक्षणावरून कोंडीत पकडत त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांची ग्रॅज्युएशन डिग्रीबाबत खुलासा करण्यात यावा, अशी याचिका दाखल करण्यात आली होती, त्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीधर पदवीशी संबंधित माहिती उघड करण्याचा केंद्रीय माहिती आयोगाचा (सीआयसी) आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केलाय. दिल्ली विद्यापीठाने केंद्रीय माहिती आयोगाच्या आदेशाला आव्हान दिले होते. २०१६ मध्ये दाखल केलेल्या माहिती अधिकार याचिकेच्या आधारे, सीआयसीने दिल्ली विद्यापीठाला पंतप्रधान मोदींच्या पदवीधर पदवीशी संबंधित माहिती उघड करण्याचे निर्देश दिले होते.

PM Modi Graduation Degree Case
..तर PM-CMची खूर्ची जाणार; १३० व्या घटनादुरूस्ती विधेयकेवर अमित शहा काय म्हणाले?

'शैक्षणिक नोंदी आणि पदव्या उघड करणे बंधनकारक नाही'

पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक नोंदी उघड करण्यावरून हा कायदेशीर लढा वर्षानुवर्षे सुरू आहे. माहिती अधिकार (RTI) अंतर्गत अर्ज दाखल केल्यानंतर केंद्रीय माहिती आयोगाने २१ डिसेंबर २०१६ रोजी १९७८ मध्ये बीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या नोंदी तपासण्याची परवानगी दिली होती. पंतप्रधान मोदींनीही ती परीक्षा त्यावेळी उत्तीर्ण केली होती. त्यांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली होती.

PM Modi Graduation Degree Case
Trump Tariffs vs India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा फुगा फुटणार; पीएम मोदींनी आखला नवा प्लॅन

त्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सचिन दत्ता यांच्या आदेशानुसार, शैक्षणिक नोंदी आणि पदव्या उघड करणे बंधनकारक नसल्याचं न्यायालयाने म्हटलंय.

सीआयसीने दिले होते पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश

विद्यापीठाने तृतीय पक्षांशी संबंधित माहिती सार्वजनिक न करण्याच्या नियमांचा हवाला देत नकार दिलाय. केंद्रीय माहिती आयोगाने (CIC) हा युक्तिवाद मान्य केला नाही आणि डिसेंबर २०१६ मध्ये DU ला तपासणीची परवानगी देण्याचे आदेश दिले होते. कोणत्याही लोकप्रतिनिधीचीविशेषतः पंतप्रधानांची शैक्षणिक पात्रता पारदर्शक असावी, असे सीआयसीने म्हटले आहे. ही माहिती असलेले रजिस्टर सार्वजनिक दस्तऐवज मानले जाईल असेही सीआयसीने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com