Borivali News Saam Digital
मुंबई/पुणे

Borivali News: १० हजार रुपये मिळवण्यासाठी तब्बल दीड महिना बँकेत हेलपाटे; अखेर बँकेतच मांडला ठिय्या

Borivali News: पीएम सुवर्णनिधी योजनेंतर्गंत अर्ज केलेल्या लाभार्थीला दहा हजार रुपये मिळवण्यासाठी तब्बल दीड महिने बँकेचे हेलपाटे मारावे लागले. अखेर समाजसेविकेच्या मदतीने अर्जदार सलील गडकरी यांनी एसबीआय बँकेत ठिय्या मांडल्यानंतर ४७ दिवसांनी खात्यावर दहा हजार रुपये जमा झाले.

Sandeep Gawade

Borivali News

शासनाच्या वतीने अनेक योजना जाहीर करण्यात येतात. मात्र, प्रत्यक्ष योजनेत सहभागी होताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचे उत्तम उदाहरण बोरिवलीत घडले आहे. पीएम सुवर्णनिधी योजनेंतर्गंत अर्ज केलेल्या लाभार्थीला दहा हजार रुपये मिळवण्यासाठी तब्बल दीड महिने बँकेचे हेलपाटे मारावे लागले. अखेर समाजसेविकेच्या मदतीने अर्जदार सलील गडकरी यांनी एसबीआय बँकेत ठिय्या मांडल्यानंतर ४७ दिवसांनी खात्यावर दहा हजार रुपये जमा झाले.

लील गडकरी यांनी पीएम सुवर्णनिधी या योजनेअंतर्गत २१ डिसेंबर रोजी १० हजार कर्ज मिळण्याबाबत पालिकेच्या आर विभाग कार्यालयात फॉर्म भरला होता. त्यांचे कर्ज ३० डिसेंबर रोजी मंजूर झाले. मात्र, खात्यात रक्कम जमा झाली नव्हती. गडकरी यांनी २ जानेवारी रोजी बोरीवली गोराई २ येथील एसबीआय बँकेचे मॅनेजर भाऊसाहेब गावांडे यांना भेटून विचारणा केली असता कर्ज १० जानेवारीनंतर मिळेल, असे सांगितले. त्यानंतर पुन्हा १२ जानेवारी रोजी बँक मॅनेजर गावांडे यांनी आपण या काळात रजेवर होतो, त्यामुळे काम झाले नाही असे सांगितले.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बँकेत ठिय्या

सलील गडकरी यांनी समाजसेविका जोत्स्ना लोकरे यांना व्यथा सांगितली. त्यांनी ३० जानेवारी रोजी बँकेत चौकशी केल्यानंतर सर्व्हरची समस्या असल्याचे सांगण्यात आले. ६ फेब्रुवारीला पैसे जमा होतील असे सांगितले. त्यानंतरही पैसे जमा झाले नसल्याने ६ फेब्रुवारी रोजी जोत्स्ना लोकरे आणि गडकरी यांनी दुपारी १ वाजता बँकेत ठिय्या मांडला. जोपर्यंत पैसे जमा होणार नाही तोपर्यंत बँकेतून जाणार नाही, असा पवित्रा घेतला. अखेर सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर बुधवारी (ता. ७) तब्बल ४७ दिवसांनी गडकरी यांच्या खात्यात सुवर्णनिधीचे १० हजार रुपये जमा झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

SCROLL FOR NEXT