Chhagan Bhujbal : जातीनिहाय जनगणना का करत नाहीत? छगन भुजबळ यांचा सवाल

Chhagan Bhujbal : सगळे म्हणतात भुजबळ जाती जातीत भांडण लावतायेत. परंतु माझं एवढंच म्हणणे आहे माझं हिरावू नका हवं असेल तर नव्याने घ्या. असं विधान छगन भुजबळ यांनी केलंय. ते मंडलनामा या पुस्तक प्रकाशन समारंभात बोलत होते.
Chhagan Bhujbal : जातीनिहाय जनगणना का करत नाहीत? छगन भुजबळ यांचा सवाल
Published On

(सचिन गाड, मुंबई)

सगळे म्हणतात भुजबळ जाती जातीत भांडण लावतायेत. परंतु माझं एवढंच म्हणणे आहे माझं हिरावू नका हवं असेल तर नव्याने घ्या. असं विधान छगन भुजबळ यांनी केलंय. ते मंडलनामा या पुस्तक प्रकाशन समारंभात बोलत होते. "मंडलनामा" पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर देखील मंचावर उपस्थित होते.

मराठा आरक्षणावरून बोलताना छगन भुजबळ यांनी परत एकदा आपली आक्रमक भूमिका मांडली. अवघ्या काही दिवसात सर्व्हे पूर्ण करण्यात आला त्यावरूनही त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. ओबीसी समाजाच्या मंडल आयोग कसा मान्य केला गेला. त्यासाठी कितीवेळ लागला हे सांगत भुजबळ यांनी मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आहेत का हे तपासण्यासाठी करण्यात आलेल्या सर्व्हेवरून प्रश्न केला.

जर पंधरा दिवसात हा सर्व्हे झाला तर दोन तीन महिन्यात जाती जनगणनाही होईल, मग ती करावी असं छगन भूजबळ म्हणाले. काँग्रेसही तेच बोलत आहे, बावनकुळे काहीतरी बोलत आहेत. शरद पवार बोलले आहेत. अजित पवार काहीतरी बोले, आम्ही सगळं मानायला तयार आहोत. तर जाती गणना केली पाहिजे असं भुजबळ म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com