Sarkarnama open mic
Sarkarnama open mic Saam tV
मुंबई/पुणे

Sarkarnama Open Mic Season -2 : 6 नेते, एक व्यासपीठ; चिमटे, टोले, फिरकीची धम्माल; नेत्यांची वेगळ्याच रुपाचं दर्शन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : विविध विषयांवर ऐरवी एकमेकांवर सडकून टीका कारणारे नेतेमंडळी एकाच व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसलेले पाहायला मिळाले. ‘सरकारनामा ओपन माईक सिजन - 2' च्या निमित्ताने हे विविध पक्षाचे नेते एकाच फ्रेममध्ये दिसले. राजकीय मतभेद विसरून या सर्वांनी कार्यक्रमांच्या कॉन्सेप्टनुसार धमाल, मस्ती करत रंगत आणली.

‘सरकारनामा ओपन माईक सीजन - 2' कार्यक्रमामध्ये भाजपचे नेते अतुल भातखळकर , काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari), बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्या दिपाली सय्यद, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदार मनीषा कायंदे उपस्थित होत्या. मुंबईतील हॉटेल लॉर्ड ऑफ ड्रिंक्स हे व्हेन्यू पार्टनर होते. (Live Marathi News)

माध्यमांसमोर बोलतांना यॉर्कर प्रश्नावर षटकार मारणाऱ्या नेते मंडळींची मात्र या कार्यक्रमात अनेकदा अडचणीच्या प्रश्नांवर कोंडी झाली. यावेळी यांना प्रश्न विचारण्यासाठी कुणी माध्यम प्रतिनिधी नव्हते तर नेत्यांनीच नेत्यांना प्रश्न विचारले.नेत्यांचे प्रश्न आणि नेत्यांचीच उत्तर यामुळे एक वेगळाच अनुभव प्रेक्षकांना आला. राजकारण विसरुन नेतेमंडळींनीही या कार्यक्रमात आपल्या व्यक्तीमत्वाची वेगळी बाजू दाखवली.

कार्यक्रमातील कॉन्सेप्टनुसार पहिल्या राऊंड 'काढा डिटेक्टर' होता. यामध्ये नेत्यांना काही प्रश्न विचारण्यात आले, त्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी योग्य दिले की नाही हे ठरवण्याची जबाबदारी इतर नेत्यांवरच होती. ते त्यांच्या उत्तराशी सहमत नसतील तर तीन वेळा घंडी वाजवायची, असे सांगितले होते. नेत्याने दिलेल्या उत्तराशी इतर जण सहमत असतील तर त्यांना ज्यूस मिळणार होता. मात्र, जर इतर नेते सहमत नसतील तर त्यांना काढा मिळणार होता. यामध्ये अनेकांना काढा मिळाला. यामध्ये सत्यजीत तांबे यांना एकदाच काढा मिळाला, तर भाजप नेते अतुल भातखळकर यांना तीन वेळा आणि दिपाली सय्यद यांना दोन वेळा काढा मिळाला.

दुसरा राऊंड होता 'ईडी' म्हणजेच ‘इकडचा डॉन’, या राऊंडमध्ये नेत्यांनीच नेत्यांना प्रश्न विचारायचे होते. त्यामध्ये संदीप देशपांडे यांनी मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांची कोंडी केली. तर अभिनयात प्राविण्य मिळवलेल्या दिपाली सय्यद राजकारणात तशा नवख्याच आहेत, त्यांना प्रश्न विचारुन इतर नेत्यांनी चांगलेच भांडावून सोडले. दोन प्रश्नावर भाषणात तरबेज असलेल्या अमोल मिटकरी अडखळले.

तिसरा राऊंड होता 'करेक्ट कार्यक्रम' उपस्थितांना काही कार्ड देण्यात आले होते. त्यामध्ये एक कार्ड त्यांनी निवडायचे होते. त्यावर फोटो असलेल्या नेत्याला ट्रोल करायचे होते. यामध्ये शिवसेनेच्या कायंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला. अतुल भातखळकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना ‘ट्रोल’ केले. अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री शिंदेंना चांगलेच टोले लगावले, अशा बिगर राजकीय कार्यक्रमात नेत्यांचा वेगळाच अंदाज बघायला मिळाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT