jagdish gaikwad
jagdish gaikwad twitter

Jagdish Gaikwad : पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांना पोलिसांकडून अटक; काय आहे प्रकरण?

पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांना कळंबोली पोलिसांनी अटक केली आहे.

सिद्धेश म्हात्रे

Jagdish Gaikwad News : पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणं चांगलंच भोवलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा झाला होता. त्यानंतर आता पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांना कळंबोली पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय आहे प्रकरण ?

पनवेलचे (Panvel) माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने केली आहेत. यानंतर अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. त्यानंतर पनवेलमधील कळंबोली पोलीस ठाण्यात जगदीश गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जगदीश गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना कळंबोली पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी गायकवाड यांना अटक करून त्यांना पनवेल कोर्टात हजर केले. त्यानंतर पनवेल कोर्टात जगदीश गायकवाड यांना जामीन मिळाला. यावेळी पनवेल कोर्टाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

jagdish gaikwad
संतापजनक! दुसरीही मुलगीच झाल्यानं पत्नीला संपवलं; नंतर पतीनंही रेल्वेखाली उडी घेत केला आयुष्याचा शेवट

दरम्यान, पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल झाला आहे. पनवेल कोर्टातून बाहेर येताच कर्जत पोलीस देखील जगदीश गायकवाड यांना ताब्यात घेण्यासाठी आले. त्यावेळी गायकवाड यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलिसांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न गायकवाड यांनी केला. मात्र, पनवेल कोर्टाबाहेर गायकवाड आले असता कारमध्ये बसल्यावर त्यांना कर्जत पोलिसांनी अडवले. त्यानंतर कर्जत पोलीस हे जगदीश गायकवाड यांना घेऊन कर्जत पोलीस ठाण्याकडे रवाना झाले.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com