Sanjay Raut  Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut News : आम्हाला हाच सामना पाहिजे; नारायण राणेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राऊत थेट बोलले

Sanjay Raut News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. 'आम्हाला हाच सामना पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

Vishal Gangurde

मयूर राणे, मुंबई

Sanjay Raut News :

मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांनी माघार घेतल्याची माहिती दिली. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून किरण सामंत यांनी माघार घेतल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. किरण सामंत यांनी माघार घेतल्याने या जागेसाठीचे इच्छुक उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. 'आम्हाला हाच सामना पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडीवर भाष्य केलं. किरण सामंत यांच्या माघार घेण्याच्या भूमिकेविषयी संजय राऊत म्हणाले, 'मला त्याबाबत माहीत नाही'. यामुळे नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना होणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत ते म्हणाले, 'आम्ही त्या सामन्याचं स्वागत करतो. आम्हाला हाच सामना पाहिजे'.

भाजप खासदार उन्मेष पाटील यांच्या ठाकरे गटाच्या प्रवेशाबाबत संजय राऊत म्हणाले, 'भारतीय जनता पक्षाचे जळगावचे विद्यमान खासदार उमेश पाटील हे मातोश्रीवर १२ वाजता प्रवेश करणार आहेत. तसेच त्यांच्याबरोबर जे त्यांचे अनेक सहकारी, नगराध्यक्ष ,पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे जळगाव लोकसभा अधिक रंगतदार आणि शिवसेनेला विजयाच्या दिशेने हमखास घेऊन जाणारा हा पक्षप्रवेश आहे'.

'शिवसेना पक्षप्रमुख आज किंवा उद्या लवकरच जाहीर करतील की, जळगावातून कोण निवडणूक लढवेल. उन्मेष पाटील यांच्या प्रवेशाने जळगावमध्ये शिवसेना ही मजबुतीने पुढे जाईल. त्यांची आणि शिवसेनेची ताकद एकत्र येईल. या वेळेला प्रथमच जळगावमध्ये लोकसभेला सेनेचा खासदार निवडून येईल, यांची आमच्या मनात शंका नाही, असेही राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Friend: तुमच्या आजूबाजूला असलेले फेक फ्रेंड्स कसे ओळखायचे? जाणून घ्या 'या' सिक्रेट टिप्स

Manikrao Kokate News: कॅबिनेटमधून कोकाटे आऊट मुंडे इन? मंत्रिपदासाठी मुंडेंची दिल्ली दरबारी फिल्डिंग

Chanakya Niti: फक्त मेहनत अन् शिस्त नव्हे, यशस्वी लोकांची ही गुपितं करा फॉलो, शत्रूही होतील मित्र

Dhurandhar: 'धुरंधर'नं मोडली दक्षिणेची मक्तेदारी; बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'ची 400 कोटींची कमाई

ड्रोनने रेकी, महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास; पोलिसांकडून सिनेस्टाईल अटक

SCROLL FOR NEXT