Mumbai News : मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेच्या कारवाईनंतर राजकीय पडसाद उमटू लागले आहे. यानिमित्ताने ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते, कार्यकते पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील यावर संतप्त प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
अनिल परब हे त्या भागातले विभागप्रमुख आहेत. त्यांनी काल शेकडो शिवसैनिकांसह तिथे मोर्चा काढला. मोर्चातल्या शिवसैनिकांना आणि जनतेच्या भावना अत्यंत संतप्त आणि तीव्र होत्या. एक जुनी शाखा 40-50 वर्षे जुनी असून हातोडे मारून तोडण्यात आली.
यावेळी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर हातोडे मारले जात होते. लाज नाही वाटली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि सरकारला? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी विचारला.
सध्याचं सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालले आहे, असं म्हणता. माझी पक्की माहिती आहे हे हातोडे मारण्याच्या आदेश वर्षा बंगल्यावरून आले होते. मुख्यमंत्र्यांचे दिवटे चिरंजीव, त्यांच्याकडे कुणीतरी गेलं. त्यानंतर त्यांनी हे आदेश दिले आहेत, असा आरोपही संजय राऊत यांनी केला. (Political News)
पण त्यांना हे कळलं नाही ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर आपण रोजी रोटी खात आहे, कोट्यावधी कमावत आहे, त्या बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडे मारले जात आहेत. हे कसले शिवसैनिक. त्यांनी शिवसेनेचे नाव घेऊ नये. ते नकली आणि डुप्लिकेटच राहणार आहेत, असा घणाघातही त्यांनी केला.
बाळासाहेब ठाकरेंच्या नावावरती तुम्ही आतापर्यंत जगलात, वाढलात आणि फुटलात. त्यांच्याच नाववर तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री पद मिळवले. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर तुम्ही हातोडे मारण्याचे आदेश देता.हा निर्लज्जपणाचा कळस आहे, असंही संजय राऊत म्हणाले. (Maharashtra Politics)
अनिल परब आणि इतर कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गन्ह्यांवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंसाठी आम्ही असे अनेक खटले अंगावर घेऊ. अनिल परब सक्षम आहेत. आम्ही सगळे सक्षम आहोत. परत जर असं काय केलं तर परत तेच होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.