Abu Azmi Received Threat: फक्त 3 दिवसांचा वेळ आहे! अबू आझमी यांना व्हॉट्सअॅपवर जीवे मारण्याची धमकी

Threats: यांच्या फोटोत त्यांच्यावर बंदूक रोखत ते टार्गेट असल्याचा उल्लेख करण्यात आलाय.
Abu Asim Azmi received threat
Abu Asim Azmi received threatSaamTv
Published On

Abu Azmi News: राजकीय विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. अबू आझमी यांना त्यांच्या व्हॉट्सअॅपवर धमकी देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

व्हॉट्सअॅपवर पाठवला फोटो

आझमी यांना त्यांच्या व्हॉट्सअॅपवर धमकीचा (Threats) फोटो पाठवण्यात आला आहे. यामध्ये यांच्या फोटोत त्यांच्यावर बंदूक रोखत ते टार्गेट असल्याचा उल्लेख करण्यात आलाय. तसेच रक्ताने माखलेला चाकू देखील फोटोवर लावण्यात आला आहे.

Abu Asim Azmi received threat
Pune Crime News: पुण्यात गुंडांची दहशत! अरण्येश्वर भागात 10 ते 15 वाहनांची तोडफोड; घरांवरही दगडफेक

फक्त ३ दिवसांचा वेळ

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांना हा फोटो पाठवत धमकीमध्ये लिहिलं आहे की, आता फक्त '3 दिवसांचा वेळ आहे!' या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीये. अबू आझमी यांनी पोलिसात या बाबत तक्रार दाखल केली आहे. कुलाबा पोलीस ठाण्यात अज्ञाता विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस धमकी देणाऱ्या अज्ञाताचा शोध घेत आहेत.

पवारांना धमकी

गेल्याच आठवड्यात राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना देखील धमकी देण्यात आली होती. पवारांनी धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने नैराश्यातून पवारांना धमकी दिल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. त्यानंतर आता अबू आझमी यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं आहे.

Abu Asim Azmi received threat
UP Crime News: लग्नघरात घडलं भयंकर! नवरा- नवरीसह ५ जणांची निर्घृण हत्या; ह्रदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com