CM Eknath Shinde and Sanjay Raut  Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut On CM : हिंमत असेल चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या; संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान, नाहीतर...

बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

Shivani Tichkule

Sanjay Raut News : अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा कोणताही संबंध नसल्याचा मोठा दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला होता. पाटलांच्या या वक्तव्यानंतर राज्याचं राजकारण चांगलाच तापलं आहे. बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. Latest Marathi News)

स्वतःला शिवसेनेचा (Shivsena) वारसदार समजणारे मुख्यमंत्री अजूनही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. हा शुद्धा लाचार, लाळघोटेपणा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान, संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा त्यांच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

मुख्यमंत्री स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून मिरवताय तर मग बाळासहेबांच्या अपमानानंतर शांत का? बाळासाहेब यांचे अपमान करणारे आजही तुमच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर तुम्ही मिंधे आहात. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान असता कामा नये या संदर्भात मुख्यमंत्री भूमिका घेणार आहेत का? असा संतप्त सावंत देखील संजय राऊतांनी (Sanjay Raut) यावेळी विचारला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील याप्रकरणावरुन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खडसावल्याबद्दल संजय राऊतांना विचारले. यावेळी राऊत म्हणाले की, मला माहित नाही. चंद्रकांत पाटलांना मंत्रीमंडळातून काढले आहे का? या हवेतल्या गप्पा नको आहेत. मुख्यमत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा असे राऊत म्हणाले. नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro Line 8 : मुंबई - नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रो-८ द्वारे जोडणार, गोल्डन लाईनवर कोणती २० स्थानके असणार? नावं आली समोर

Pista Kulfi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी पिस्ता कुल्फी रेसिपी

WhatsApp Update: WhatsApp हॅक होण्याचा धोका संपला! 'हे' नवीन फिचर आत्ताच करा ऑन, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, भुजबळांसह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT