Amit Shah-Chandrakant Patil
Amit Shah-Chandrakant PatilSaam Tv

Amit Shah Upset News: निवडणुकीच्या तोंडावर अशी विधाने खपवून घेतली जाणार नाही, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अमित शहा नाराज

Political News : केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीवर बोलण्यावर भर द्या, असं अमित शाह यांनी म्हटलं.
Published on

Political News : अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा कोणताही संबंध नसल्याचा मोठा दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला होता. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला होता.  चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, अशा शब्दात अमित शाह यांनी भाजप नेत्ंयाना खडसावलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वादग्रस्त विधाने करण्यापेक्षा केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीवर बोलण्यावर भर द्या, अशी ताकीद अमित शाह यांची भाजप नेत्यांना दिली आहे.

Amit Shah-Chandrakant Patil
Anjali Damania Tweet: अजित पवार लवकरच भाजपसोबत जाणार; अंजली दमानियांच्या ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ

चंद्रकांत पाटलांचा स्पष्टीकरण

 बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. 'बाबरी'चा ढाचा पाडताना विश्व हिंदू परिषदेचा बॅनर होता. मला कुणाचा अनादर करायचा नव्हता. माझ्या वक्तव्याचा विपर्यास यापूर्वीही अनेकदा केला गेला. राजकीय हेतूने वाद निर्माण करतात. बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आदर आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर काही बोलणार नाही, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. (Political News)

Amit Shah-Chandrakant Patil
Chandrakant Patil On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर चंद्रकांत पाटलांनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले, बाळासाहेब...

बाबरी मशिदी संदर्भात मांडलेली भूमिका त्यांची व्‍यक्‍तीगत- बावनकुळे

चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिदी संदर्भात मांडलेली भूमिका त्यांची व्‍यक्‍तीगत असेल, परंतु ती पक्षाची भुमिका नसल्‍याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज स्‍पष्‍ट केलं आहे. रामजन्म भूमीचं आंदोलन हा एक मोठा विचार होता. बाळासाहेब ठाकरे यांचे या आंदोलनाला समर्थन होत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक त्याठिकाणी नव्हते; अस म्हणणं चुकीचे आहे, असंही बावनकुळे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com