Anjali Damania Tweet: अजित पवार लवकरच भाजपसोबत जाणार; अंजली दमानियांच्या ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ

Ajit Pawar News: अंजली दमानिया यांच्या एका ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Ajit Pawar- Anjali Damania
Ajit Pawar- Anjali DamaniaSaam TV
Published On

Mumbai News : राज्याच्या राजकारणात येत्या काळात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. ठाकरे-शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निकालानंतर राज्यातील सत्तासमीकरणात काय बदल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सर्व राजकीय घडामोडींदरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar- Anjali Damania
Saamana Editorial on BJP: भाजपचे हिंदुत्व ढोंगी , तर मुस्लिम प्रेमदेखील मतलबी; 'सामना'तून जोरदार टीका

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचा मोठा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये अंजली दमानिया यांनी म्हटलं की, 'आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. बघू..... आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची.'

अंजली दमानिया यांच्या ट्वीटमुळे राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे. कारण काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मध्यंतरी अजित पवार नॉट रिचेबलही झाले होते. मात्र आपली तब्येत ठिक नसल्याने आपण आराम करत होतो, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं होतं. मात्र आता अंजली दमानिया यांच्या ट्वीटने पुन्हा एकदा या चर्चा सुरु झाल्या आहेत. (Political News)

Ajit Pawar- Anjali Damania
Maharashtra Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; काय आहे कारण?

16 आमदार अपात्र ठरले तरीही शिंदे सरकार कोसळणार नाही

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 16 आमदार अपात्र ठरले तरीही शिंदे सरकार कोसळणार नाही. कारण त्यांच्याकडे बहुमत आहे. जास्त आमदार अपात्र ठरले तर राष्ट्रपती राजवट लागेल. राष्ट्रवादीचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही, असं राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com