Sudhir Mungantiwar Saam Tv
मुंबई/पुणे

''मुनगंटीवारांनी नाक खूपसू नये; मंत्रिमंडळ जैसे थे राहिल असं मला वाटतं''

मुंख्यमंत्री काही कारवायांमध्ये लक्ष घालतात हे कायद्याचे राज्य आहे.

साम टिव्ही ब्युरो

भूषण शिंदे

मुंबई: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर शिवसेनेतील नेते नाराज आहेत अशी चर्चा होती. याच पार्श्वभूमिवर आज गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले माझा माझ्या सहकाऱ्यांवर विश्वास आहे. आणि शिवसेना नेते संजय राऊतही (Sanjay Raut) माध्यमांशी बोलले. त्यांनिही मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे. बाकी सर्व अफवा या विरोधी पक्षांकडून पसरवल्या जातात त्या निरर्थक आहेत असेही संजय राऊत म्हणाले. या क्षणी आहे त्या रचनेमध्ये कुठलाही बदल होईल असं मला वाटत नाही असेही राऊत म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) व्यवस्थित सुरू आहे. मुनगंटीवारांनी नाक खूपसायची काय गरज आहे, तुम्ही कोण सांगणारे? गृहमंत्री-मुख्यमंत्री पद कोणाला हवंय? कोणाला कोणते मंत्री पद द्यायचं हे आम्ही तिघे बसून पाहू तुम्हाला त्यात लक्ष द्यायचं काम नाही असे म्हणत राऊतांनी मुनगंटीवारांना चांगलेच खडसावले आहे.

हे फक्त माझंच मत नाही तर...

मुंख्यमंत्री काही कारवायांमध्ये लक्ष घालतात हे कायद्याचे राज्य आहे. केंद्रीय तपास यंत्रणा बेकायदेशीरपणे कारवाया करतात, अशा कारवाया महाराष्ट्र सरकार करणार नाही. राजकीय सुधारणा किंवा बदल्यापोटी कुठलीही कारवाई होणार नाही यालाच कायद्याचं राज्य म्हटले जातं असे संजय राऊत म्हणाले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा या आपल्यावर अतिरेक्या प्रमाणे कारवाई करत आहेत. त्याला जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे. हे फक्त माझंच मत नाही तर मुख्यमंत्री-गृहमंत्री आणि सर्वांचेच मत असल्याचे राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं असावं राज्य हाकण्यासाठी एक दिशा मिळते. तीन पक्षाच्या सरकारमध्ये सत्तेचे वाटप होतं त्यानुसार वाटप झालेला आहे.

"राजकीय गुन्हेगारांच्या कॉरलमध्ये हात घातला जाईल"

योग्य वेळी त्यांच्या कॉलरला हात घालायचा आहे. अशा राजकीय गुन्हेगारांच्या कॉलरमध्ये हात घातला जाईल असेही राऊत म्हणाले. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यामध्ये कुठलाही विसंवाद नाही. विरोधक म्हणतात की राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद हवे, पण दुसरीकडे भाजपाचा सुद्धा मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे. मुख्यमंत्रीपद प्रत्येकाला हवा असतं. पण भाजपने लक्षात घ्यावं महाविकास आघाडीने ठरवलंय मुख्यमंत्री पद पाच वर्ष शिवसैनिकाकडेच राहील. मी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया होतात याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिले त्यांच्याकडून आता नेमकं काय प्रतिसाद मिळतो याची मी वाट पाहात असल्याचं राऊत म्हणाले. आता राज्याच्या तपास यंत्रणांकडे जे कागदपत्र दिले आहेत त्यावर नेमकी काय कारवाई झाली हे लवकरच तुम्हाला दिसेल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT