Sanjay raut
Sanjay raut  saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut News: संजय राऊतांच्या जामीन अर्जाचा निकाल कोर्टाने राखून ठेवला; ९ नोव्हेंबरला होणार सुनावणी, कस्टडीही वाढवली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sanjay Raut Latest News: पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीये. आज, बुधवारी राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. राऊत यांनी आपल्याला जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता, राऊत यांच्या या जामीन अर्जाचा निकाल मुंबई सत्र न्यायालयाने राखून ठेवला आहे. तसेच सध्या सुनावनी पुढे ढकली असून पुढील सुनावनी ही ९ नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे राऊतांची कस्टडीही वाढण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या भेटीसाठी शिवसेना नेते अनिल परब हे कोर्टात दाखल झाले होते. (Patra Chawl Scam News)

पत्राचाळ प्रकल्पातून संजय राऊतांनी पैसे कमावले असे ईडीने (ED) म्हंटल आहे. वाधवान बंधूंसोबत संगनमत संजय राऊत यांनी पैसे कमावले असे या आरोप ईडीने केला आहे. पत्राचाळ प्रकरणातले प्रमुख आरोपी संजय राऊतच असल्याचंही ईडीने यात म्हटलं आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत हा घोटाळा झाला असाही उल्लेख ईडीच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. (Sanjay Raut Latest News)

काय आहे पत्राचाळ घोटाळा?

रिपोर्टनुसार पत्राचाळ मुंबईतील गोरेगाव येथे आहे. चाळीत राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने एचडीआयएलच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला कंत्राट दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन तीन हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती.

गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान आहे. वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांचा संबंध आहे. प्रवीण राऊत यांनी राकेश वाधवानसोबत मिळून पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक आणि सुटका झाली. त्यानंतर पुन्हा 2 फेब्रुवारी 2022 रोजी प्रवीण राऊत यांना पुन्हा अटक झाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

SCROLL FOR NEXT