Mumbai Fire News: मुंबईत छबिलदास हायस्कूलमध्ये LPG सिलेंडरचा भयंकर स्फोट; तीन जण जखमी

LPG Cylinder Blast In Mumbai: मुंबईच्या दादर पश्चिमेत छबीलदास सभागृहामध्ये पहाटे पाच सुमारास एलपीजी सिलेंडर ब्लास्ट होऊन आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
LPG cylinder Blast
LPG cylinder BlastSaam TV
Published On

निवृत्ती बाबर, मुंबई

Mumbai Cylinder Blast News: मुंबईच्या दादर पश्चिमेत छबीलदास सभागृहामध्ये आज पहाटेच्या पाच सुमारास एलपीजी सिलेंडर ब्लास्ट (Cylinder Blas) होऊन आग लागल्याची धक्कादायक घटना आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाणे हद्दीतील छबिलास इंग्लिश मीडियम हायस्कूल, दादर पश्चिम या शाळेच्या टेरेसवर मंगळवारी एलपीजी गॅसचा स्फोट झाल्याने आग लागल्याची घटना समोर आली. (Mumbai Latest News)

LPG cylinder Blast
Nashik Crime News: जलसंपदा विभागातील क्लर्कची गळा आवळून हत्या; शासकीय वसाहतीत खून झाल्याने नाशकात खळबळ

या आगीमध्ये छबिलदास शाळेच्या कॅन्टीनमध्ये झोपलेले केटरिंगचे काम करणारे कामगार 1) भरत माधव सिंग जारंग, वय 25 वर्ष, हा जखमी झाला असून 2) जावेद अली मोहम्मद सज्जाद अली, 38 वर्ष, याच्या डोक्याला मार लागला आहे. दोघांनाही उपचारासाठी सायन रुग्णालय येथे नेण्यात आले. पोलीस स्टाफसह फायर ब्रिगेडच्या मदतीने आग विझवण्यात आली आहे.

या आगीमध्ये (Fire) टेरेसचे लोखंडी पत्रे खाली पडलेले आहेत, त्यामुळे शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या दोन कारचे नुकसान झालेले आहे. शाळेच्या इमारतीला ठिकठिकाणी तडे गेलेले आहेत. एकापेक्षा जास्त सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याने संपूर्णपणे मजला उध्वस्त झाला आहे, दुसऱ्या मजल्याचा स्लॅब देखील खाली पडला आहे. (Massive Explosion of LPG cylinder in Chhabildas School Mumbai)

LPG cylinder Blast
Covid-19 In Mumbai: मुंबईत १८ दिवसांच्या अंतरानंतर कोरोनामुळे एकाचा मत्यू, एकूण 580 रुग्ण घेतायत उपचार

या ब्लास्टमुळे समोरील घरांमध्ये देखील काचेचे तुकडे उडाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन अर्धा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र हा सिलेंडर ब्लास्ट कशामुळे झाला याचा तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com