CCTV footage shows thieves stealing sandalwood trees from a housing society in Pune’s Manjari area during early morning hours. Saam tv
मुंबई/पुणे

पुण्यातल्या सोसायटीत चक्क चंदन चोरी! 15 मिनिटांत झाडे कापून चोर फरार

Sandalwood Tree Theft Pune Manjari Cctv: पुण्यातील मंजरी परिसरात सोसायटीतून चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी झाडे कापून नेल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

पुणे: पुण्यात भरवस्तीत चंदनाच्या झाडांची चोरी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरालगतच्या मांजरी परिसरात एका सहकारी गृहरचना सोसायटीतून चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सुमारे आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्ग लगत असलेल्या सोसायटीत पहाटे एका पांढऱ्या कारमधून तीन तरुण आले. त्यांनी प्रवेशद्वार क्रमांक दोनवर सुरक्षारक्षकाला धमकावत सोसायटीत प्रवेश केला. यानंतर क्लब हाऊसमधील मोकळ्या जागेत असलेली पूर्ण वाढ झालेली वाढ दोन चंदनाची झाडे त्यांनी अवघ्या 10 ते 15 मिनिटांत कापून टाकली. झाडांची खोडे उचलून त्यांनी प्रवेशद्वार क्रमांक 1 मधून बाहेर जात कारमध्ये टाकली आणि घटनास्थळावरून पसार झाले.

दरम्यान या घटनेनंतर सोसायटीकडून मंजरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT