Salman Khan Home Firing Case  Saam Tv
मुंबई/पुणे

Salman Khan House Firing: सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दुसऱ्याही हल्लेखोराची ओळख पटली, आणखी एक CCTV

Salman Khan House Firing CCTV: बाईकवरून आलेल्या दोन अज्ञातांनी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केला होता. या घटनेचा आता दुसरा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

Salman Khan Home Firing Case :

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांच्या घरावर रविवारी पहाटे गोळीबार करण्यात आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली. बाईकवरून आलेल्या दोन अज्ञातांनी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केला होता. या घटनेचा आता दुसरा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. त्याचसोबत सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दुसऱ्या संशयित आरोपी देखील ओळख पटली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावरील गोळीबारचे आणखीन एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. रविवारी सकाळी ४.५५ मिनिटांनी सलमानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. चार राऊंड फायर करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. या गोळीबारामध्ये एक गोळी सलमान खानच्या गॅलरीमधून घरात शिरली. तर एक गोळी इमारतीच्या भिंतीवर आदळली. घटनास्थळावरून पोलिसांनी एक जिवंत काडतूस देखील जप्त केले आहे.

तर दुसरीकडे, सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दुसऱ्या संशयिताची ओळख पटली आहे. विशाल उर्फ कालूसोबत त्याचा सारंग नावाचा साथीदार होता. दोघांनीही बाईकवरून येऊन सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता. सलमानच्या घरावर गोळीबार करून दोघेही बिहारला पळल्याचा संशय आहे. बिहार, जयपूर तसेच दिल्लीला मुंबई गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली आहे. याप्रकरणाचा मुंबई पोलिस कसून तपास करत आहेत.

दरम्यान, रविवारी दुपारी अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबूक अकाउंटवरुन सलमान खानबद्दल एक पोस्ट व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये बिश्नोई गँगमधील एका सदस्याने या गोळीबाराची जबाबदारी घेतल्याचे स्पष्ट झाले होते. गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणाऱ्या अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाउंटचा आयपी अड्रेस कॅनडामध्ये असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. ते फेसबुक अकाऊंट हल्ल्याच्या काही तासांपूर्वी उघडण्यात आलं होतं. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल सीडीआरच्या माध्यमातून पोलिस संबंधित प्रकरणी सखोल तपास करत आहे. त्याचसोबत मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे. याआधी सलमान खानला बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT