Salman Khan Galaxy Apartment: कोट्यवधींची संपत्ती, तरीही राहतो छोट्याशा फ्लॅटमध्ये; सलमान खाननं स्वत:च केला होता खुलासा

Salman Khan News: सलमान गेल्या अनेक दिवसांपासून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येच राहतो. नेमकं त्या मागील कारण काय ?, तो इतक्या कोटींचा मालक असूनही का अजूनही तो तिकडेच राहतो?, जाणून घेऊया.
Why Does Salman Khan Stay In Galaxy Apartment
Why Does Salman Khan Stay In Galaxy ApartmentSaam Tv

Why Does Salman Khan Stay In Galaxy Apartment

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान नेहमीच या ना त्या कारणानं चर्चेत असतो. सध्या सल्लू मिया आणि त्याचं वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट चांगलंच चर्चेत आले आहे. १४ एप्रिलला पहाटे ५ वाजता वांद्र्यातल्या घरावर दोन अज्ञात आरोपींनी गोळीबार केलाय. त्यामुळे सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटची जोरदार चर्चा होत आहे. सलमान गेल्या अनेक दिवसांपासून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येच राहतो. नेमकं त्या मागील कारण काय ?, तो इतक्या कोटींचा मालक असूनही का अजूनही तो तिकडेच राहतो ?, जाणून घेऊया... (Bollywood)

Why Does Salman Khan Stay In Galaxy Apartment
Dharma: The AI Story : मराठीत Artificial Intelligence वर चित्रपट येतोय; परदेशात शुटिंगलाही सुरुवात, कलाकार कोण?

सलमान खान (Salman Khan) हा बॉलिवूडचा स्टायलिश अभिनेता म्हणून ओळखला जातो. मात्र, सलमानला साध्या राहणीमानाची आवड आहे. सलमान खान हा वांद्रे येथे गॅलक्सी अपार्टमेंटमधील १ बीएचके फ्लॅटमध्ये राहतो. एका चित्रपटासाठी १०० कोटींहून अधिक मानधन घेणाऱ्या सलमान खानने कपिल शर्माच्या कार्यक्रमात मोठा खुलासा केला होता. सलमानने म्हटलं होतं, 'मला कुटुंबासोबत राहायला आवडतं. त्या घरात राहून कुटुंबाच्या जवळ राहिल्यासारखं मला वाटतं. मी कधीही मोठ्या घरासाठी खर्च करणार नाही'. सलमान आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. (Bollywood Actor)

Why Does Salman Khan Stay In Galaxy Apartment
Swapnil Joshi: "आता लव्ह ट्रँगल बदलावा लागणार..."; स्वप्निल जोशी 'बाई गं' मध्ये एकाच वेळी ६ अभिनेत्रींसोबत दिसणार

फराह खानच्या 'तेरे मेरे बीच में' या चॅट शोमध्ये सलमान खानने आपल्या घराबद्दल भाष्य केले होते. फराह खानने सलमान खानला प्रश्न विचारलेला की, 'तू सुपरस्टार आहेस आणि करोडोंची कमाई करतोस, तरीही पण तु 1BHK घरामध्ये का राहतो?', यावर अभिनेत्याने उत्तर दिले होते की, 'खरंतर, माझं 3BHK घर आहे. पण तो 1BHK कसा बनला हे मलाच माहीत नाही. माझं घर गॅलेक्सी अपार्टमेंटच्या ग्राऊंडला आहे. तर माझे आई-वडील पहिल्या मजल्यावर राहतात.' (Salman Khan)

Why Does Salman Khan Stay In Galaxy Apartment
Sanskruti Balgude: संस्कृती बालगुडेला मिळाला आणखी एक नवा चित्रपट, लवकरच दिसणार हटक्या भूमिकेत

फराह खानने सलमानला आणखी एक प्रश्न विचारला. 'तु तुझ्या आईचा खूपच जवळचा व्यक्ती आहेस, यामुळे तुला सुरक्षितता वाटते का ?' या प्रश्नावर सलमान म्हणाला, 'ज्यावेळी आम्ही त्यांच्या घरी जातो, त्यावेळी आम्ही आई आणि वडीलांसोबत झोपतो.' सोबतच यावेळी सलमानने चाहत्यांबद्दलही भाष्य केलं आहे. तो म्हणाला की, 'काही वेळेसाठी का होईना, मला चाहत्यांना भेटावे असं वाटतं. पोलिस मला अनेकदा म्हणतात, तुम्ही तुमची झलक चाहत्यांना दाखवा. त्यामुळे किमान त्यांची रहदारी तरी कमी होईल.' (Bollywood News)

सलमानला कोणत्याही महागड्या वस्तूंची आवड नाही. दुसऱ्यांच्या मदतीसाठी भाईजान नेहमी तत्पर असतो. सलमानच्या घरातील लिव्हिंग एरियामध्ये सोफा आणि डायनिंग टेबल आहे. तसेच त्याच्या घरात व्यायामासाठीही एक छोटीशी जागा आहे. (Entertainment News)

Why Does Salman Khan Stay In Galaxy Apartment
Salman Khan Home Firing: सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचा कट पूर्वनियोजितच होता; तपासातून बरेच खुलासे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com