Sanskruti Balgude: संस्कृती बालगुडेला मिळाला आणखी एक नवा चित्रपट, लवकरच दिसणार हटक्या भूमिकेत

Sanskruti Balgude New Film: इन्स्टाग्रामवरून चाहत्यांसोबत एक इन्स्टा स्टोरी शेअर करत, संस्कृती बालगुडेने आगामी प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना दिलेली आहे.
Sanskruti Balgude
Sanskruti BalgudeSaam Tv

Sanskruti Balgude Latest Movie

फॅशन, लाइफस्टाइल आणि अभिनय अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अभिनेत्री संस्कृती बालगुडे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. संस्कृती कायमच इन्स्टाग्रामवर आपल्या स्टायलिश अंदाजामुळे चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असते. गेल्या काही दिवसांपासून संस्कृती बालगुडे इन्स्टाग्रामवर फारशी सक्रिय दिसून येत नाही. अशातच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवरून चाहत्यांसोबत एक इन्स्टा स्टोरी शेअर करत, आगामी प्रोजेक्टची माहिती दिलेली आहे. (Marathi Actress)

Sanskruti Balgude
Salman Khan Home Firing: सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचा कट पूर्वनियोजितच होता; तपासातून बरेच खुलासे

संस्कृती बालगुडे नेहमीच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. काही दिवसांपासून संस्कृतीने सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता. आता नुकतीच ती सोशल मीडिया वर पुन्हा आली आहे. संस्कृतीने इन्स्टाग्रामवर लेह लदाखमधून एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. नेमकी अभिनेत्री लदाखला व्हेकेशन सेलिब्रेशन करण्यासाठी गेली आहे का?, की कोणत्या चित्रपटाच्या शुटिंगसाठी लदाखला गेली, अद्याप हे कारण अस्पष्ट आहे. शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तिच्या हातात स्क्रिप्टही दिसत आहे. वैविध्यूर्ण भूमिकेच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये संस्कृती चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. (Marathi Film)

Sanskruti Balgude
Salman Khan Firing House: सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हल्लेखोरांचा मुंबई लोकलने प्रवास, वांद्र्यातून सांताक्रुझ स्टेशन गाठलं
Sanskruti Balgude Instagram Post
Sanskruti Balgude Instagram PostInstagram

संस्कृती बालगुडेची अभिनय, नृत्य आणि अनेक कलांची आवड जोपासणारी अभिनेत्री अशी ओळख आहे. संस्कृती लवकरच एका बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेता शारिब हाश्मीसोबत ती या हिंदी- इंग्रजी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. हा बॉलिवूड प्रोजेक्ट नक्की काय असणार आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. पण संस्कृती लवकरच अधिकृत माहिती देणार आहे. आपला दमदार अभिनय, फॅशन सेन्स, डान्स यामुळे संस्कृती नेहमीच चर्चेत राहते. आता ती तिच्या बॉलिवूड एन्ट्रीमुळे चर्चेत आली आहे. (Entertainment News)

Sanskruti Balgude
Salman Khan Galaxy Apt Firing: भाईजानच्या जिवाला धोका; बिश्नोई गँगच्या रडारवर सलमान खान? काय आहे प्रकरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com