Sachin Sawant Slams BJP For Oppose Tipu Sultan Name Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: "भाजपासाठी 2013 चे टिपू वेगळे, 2022 ला वेगळे!" - सचिन सावंतांचा टोला...

Tipu Sultan Controversy In Mumbai: याबाबत कॉंग्रसेचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपवर टीका करत निवडणुकीसाठी हा दुटप्पीपणा केल्याच्या आरोप केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मालाड मधील मालवणी भागात एका क्रीडा संकुलाला दिलेल्या टिपू सुलतान या नावावरून मुंबईतील (Mumbai) राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. पण कधी काळी या संकुलाला टिपू सुलतान (Tipu Sultan) यांचे नाव देण्याची मागणी करणारे आज याच नावाला विरोध करत आहेत असं दिसतंय. याबाबत कॉंग्रसेचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपवर टीका करत निवडणुकीसाठी हा दुटप्पीपणा केल्याच्या आरोप केला आहे. (Congress Leader Sachin Sawant Slams BJP For Oppose Tipu Sultan Name)

हे देखील पहा -

सचिन सावंत यांनी काही जुनी कागदपत्रं शेयर केली आहेत. त्यात २०१३ साली त्याच भागातील एका रस्त्याला टिपू सुलतान यांचे नाव देण्यासाठी भाजप नगरसेवकांनी कशाप्रकारे पुढाकार घेतला होता हे दाखवण्यासाठी त्यांनी थेट भाजपच्या नगरसवेवकांची यादीच शेयर केली आहे. याशिवास कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांनी टिपू सुलतानबाबत काय नोंद केली हेदेखील सावंत यांंनी सांगितलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये सचिन सावंत माहिती देतात की, "मुंबईच्या एम/पूर्व वॉर्डातील रस्त्याला शहीद टिपू सुलतान मार्ग नाव देण्याच्या भाजपा नगरसेवकाच्या प्रस्तावाच्या समर्थनासाठी दुथडी भरून भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते. भाजपासाठी २०१३ चे टिपू वेगळे,२०२२ ला वेगळे!फरक हाच की तेव्हा निवडणूक नव्हती आता आहे. या दुटप्पीपणाला काय म्हणावे?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुढे ते म्हणाले की, "भाजपा नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा शहीद टिपू सुलतानच्या कबरीवर गेले तेव्हा तेथील अभ्यागत वही मध्ये जे टिपू सुलतान बद्दल मत मांडले आहे ते खाली देत आहे. आताची बदललेली संधी साधू भूमिका ही सत्तेसाठी भाजपच्या च्या निर्लज्जतेचा कळस निश्चितच म्हणता येईल" अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.

टिपू सुलतान हे नाव द्यावं की नाही हा वादाचा मुद्दा आहे. या नावावरून भाजपकडून केल्या जाणाऱ्या विरोधामुळे भाजप हा विकास विरोधी असल्याचं अस्लम शेख म्हणतायत. पण, दुसरीकडून या नावाला तीव्र विरोध करणाऱ्या भाजपचे सध्याचे आमदार आणि तत्कालीन नगरसेवक आणि माजी नगरसेवकांनीच हे नाव मुंबईतल्या दोन रस्त्यांना देण्याची आधी मागणी केल्यामुळे भाजपचा नेमका विरोध कशाला आहे? असा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे आता भाजप यावर काय उत्तर देणार, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

SCROLL FOR NEXT