Maharashtra Live News Update: अमरावतीच्या एमआयडीसी परिसरात फॅक्टरीला भीषण आग

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२६, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचार, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

अमरावतीच्या एमआयडीसी परिसरात फॅक्टरीला भीषण आग

ढेप बनवणाऱ्या फॅक्टरीत अचानक आग लागल्याने मोठे नुकसान.

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब दाखल.

अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज

सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती नाही

युवकाने स्वतःला पेटवून केली आत्महत्या, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

नांदेड मध्ये एका 28 वर्षीय तरूणाने स्वतःला पेटवून घेउन आत्महत्या केली.त्या युवकाचा जळत असलेला व्हिडियो समाज माध्यमावर व्हायरल झाला.. शेख सलमान अस मयत युवकाच नाव आहे.

खोपोली नगर परिषदेचा अनागोंदी कारभार उघड, 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे अर्धनग्न आंदोलन

खोपोली नगर परिषदेच्या ढिसाळ व निष्क्रिय कारभारामुळे एका 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अक्षरशः खोपोली नगर परिषद कार्यालयात न्यायासाठी कपडे काढून आंदोलन करावे लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खोपोली येथील रहिवासी कस्तुरचंद चुनाजी राठोड वय 67 हे गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्या घरासमोरील गटार बांधकामासाठी नगर परिषदेचे उंबरठे झिजवत आहेत.

- धाम नदीपात्रात अजित पवारांच्या अस्थीचे विसर्जन

अजित पवार गटाच्या नेत्यांच्या उपस्थितीत अस्थीविसर्जन

सोमवारी जिल्ह्यात आल्या होत्या अस्थी

आज दुपारपर्यंत नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या अस्थी

सुनेत्रा पवार यांनी घाई केली, ही गोष्ट खरी: आमदार चिखलीकर

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर त्यांनी घाई केली, अशा प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले यावर अनेकजण तर्कवितर्क लावत आहेत. मात्र घाई झाली आहे, नाही असं नाही. परंतु कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता सर्वांना सांभाळायचं असेल, तर कुटुंबाची सूत्रे कुणाच्या तरी हातात घ्यावी लागतात. त्यामुळे सर्वांच्या भावना लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांनी ही जबाबदारी स्वीकारली असे आमदार चिखलीकर यांनी सांगितले.

शरद पवार बारामतीत दाखल

शरद पवार त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी पोहचले

पुढील २ दिवस शरद पवार बारामती मध्येच थांबणार असल्याची माहिती

येवला शहरातील वाईन शॉपमध्ये चोरी; घटना सीसीटीव्हीत कैद

नाशिकच्या येवला शहरात चोरट्यांचा धुमाकूळ पहावयास मिळत असून मनमाड-नगर महामार्गा लागत असलेल्या ऐका वाईन शॉप मध्ये अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास शॉप चे शटर तोडून दुकानात प्रवेश केला आणि गल्ल्यात असलेली 70 हजाराची रोकड चोरून नेल्याची घटना सकाळी उघडीस आली असून चोरटा दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे,येवला शहर पोलिसात चोरीची तक्रार कैद झाली असून पोलीस सीसीटीव्ही च्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहे

अजित पवार मृत्यू प्रकरण : त्या विमानाचा ब्लॅकबॉक्स सार्वजनिक केला पाहिजे - आमदार विजयसिंह पंडित

अजित पवारांच्या विमाना अपघाताची वरिष्ठ पातळीवर चौकशी झाली पाहिजे आणि ब्लॅक बॉक्स सार्वजनिक केला पाहिजे, आमदार विजयसिंह पंडित.

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू 25 फेब्रुवारी रोजी शेगावात

केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून आयोजित 'राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2025 चं करणार उदघाटन

शेगाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2025 दुपारी बारा ते एकच्या दरम्यान राष्ट्रपती करतील उद्घाटन.

या मेळाव्याला देशभरातून विविध राज्यांचे प्रतिनिधी राहणार हजर

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रपती येत असल्याने दौऱ्याला विशेष महत्त्व.

पुण्यातील मुंढव्यात घडलेला धक्कादायक प्रकार

पुण्यातील मुंढव्यात धक्कादायक प्रकार

पुणे शहर पोलिसांविरोधात तक्रार दाखल असताना देखील पुन्हा एकदा मुंढवा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय

दिवाणी न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याचा होतोय आरोप

घोरपडीत मानवतेला काळिमा

ज्येष्ठ महिला नागरिकांना मारहाण करून ताबा घेतल्याचा आरोप

मुंढवा घोरपडीत धक्कादायक प्रकार: रेकॉर्ड वरील महिला गुन्हेगार करुणा अँथोनीकडून ज्येष्ठ महिलांना सीडीवरून फरफटत लाथा-बुक्क्यांनी मारहाण

महिला पोलिसांच्या उपस्थितीत सर्व प्रकार घडला..

कोर्ट ऑर्डर असूनही बेकायदेशीर रित्या ताबा घेण्याचा प्रकार झाला आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गॅस टँकर उलटला

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गॅस टँकर उलटला

० आडोशी बोगद्याच्या तोंडावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर अपघात

० बचाव आणि मदत यंत्रणा घटना स्थळी दाखल

पुण्यात कृत्रिम पाणीटंचाईचा डाव उघड, राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचं आंदोलन

कृत्रिम पाणीटंचाईचा डाव उघड

कळस–बोपखेल–गणेशनगरात नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचा रेखाताई टिंगरेंचा आरोप

राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचं आंदोलन

Pune: शरद पवार पुण्यावरून बारामतीकडे रवाना

पुणे -

शरद पवार बारामती कडे रवाना

पुण्यातील मोदी बागेतून शरद पवार बारामतीकडे रवाना

प्रफुल पटेल यांच्या प्रश्नावर शरद पवारांनी केवळ जोडले हात बोलणं टाळलं

Solapur: बार्शीतील महाआघाडीच्या प्रचारासाठी उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा

सोलापूर -

बार्शीतील महाआघाडीच्या प्रचारासाठी उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा

बार्शी तालुक्यातील वैराग येथे महाआघाडीच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे यांची सभा

बार्शी जिल्हा परिषद निवडणुकासाठी ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वात दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित येतं आघाडी केलीय

त्यामुळे बार्शीत भाजप विरुद्ध महाआघाडी असा सामना रंगतोय

या महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे हे उद्या दुपारी 1.30 वाजता जाहीर सभा घेतायत

या शिवाय मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात देखील एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा होणार आहेत

Parbhani: परभणी शहर महानगरपालिकेतील महापौरपदासाठी १३ अर्ज

परभणी -

परभणी शहर महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया आली रंगात

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महापौर पदासाठी 13 अर्ज तर उपमहापौर पदासाठी 7 अर्ज दाखल

Pandharpur: भाजप जिल्हाध्यक्षकडे २ मतदान ओळखपत्र, शिवसेना नेत्याचा आरोप

पंढरपूर

सोलापूर भाजप जिल्हाध्यक्षकडे दोन मतदान ओळखपत्र,

नगरपालिकेला मतदान केल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी दाखल

शिवसेना (उबाठा) नेत्याचा गंभीर आरोप

Ratnagiri: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये महायुती इतिहास घडवणार- एकनाथ शिंदे

रत्नागिरी-

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे -

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये महायुती इतिहास घडवणार

या निवडणुका कार्यकर्त्यांच्या, हेच कार्यकर्ते निवडणुका जिंकून देत असतात

महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या, महायुतीचा भगवा फडकवा

रत्नागिरी रत्नांची खाण, तीन भारतरत्न या रत्नागिरीने दिले

फसवणुक करणाऱ्यांना रत्नागिरीकर १४ वे रत्न दाखवतो

कोकणातील जनता महायुतीवर प्रेम करणारी जनता

उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या अश्विनी निकम

उल्हासनगर महानगरपालिकेला तब्बल 4 वर्षांनंतर महापौर आणि उपमहापौर मिळाले असून आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. महापौर पदी शिवसेनेच्या अश्विनी निकम यांची तर उपमहापौर पदी अमर लुंड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आलीउल्हासनगर महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी एक एकच अर्ज आल्याने तसे पाहता आजची ही निवडणूक म्हणजे निव्वळ औपचारिकता होती. रत्नागिरी चे जिल्हाधिकारी मनुज जिंदल या पिठासन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया संपन्न झाली.

पंढरपूरमध्ये माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जाहीर दम बाजी करणाऱ्या माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात उमेदवार केराप्पा पांढरे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

सोलापूर जिल्हा परिषदेच्या सांगोला तालुक्यातील कोळा गटात प्रचार सभा दरम्यान शिवसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी सांगोला विकास आघाडीचे उमेदवार केराप्पा पांढरे यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती.

याचा आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी निषेध केला आहे. तर जिल्हा परिषद गटातील उमेदवार पांढरे यांनी माजी आमदार पाटील यांच्या अशा वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अशी जाहीर दमबाजी होत असेल तर याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितलं आहे.

वसई विरार शहर पालिकेवर बहुजन विकास आघाडीचा महापौर विराजमान

  • बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी दोन्ही महापौर आणि उपमहापौर यांना शुभेच्छा दिल्या

  • ऑपरेशन लोटस नाही तर ऑपरेशन सिटी आम्ही दाखवणार हितेंद्र ठाकूर यांचा इशारा

  • जे महापौर यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते तेच लाइन मध्ये असल्याचे ठाकूर यांचे स्पष्ट संकेत

बीडमध्ये मारहाणीचे सत्र कायम, आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तरुणावर चाकूने वार

बीड जिल्ह्यामध्ये मारहाणीचे सत्र कायम असून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यामध्ये पोलीस अपयशी ठरताना पाहायला मिळत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड राज्याच्या केंद्रस्थानी आले असून बीड जिल्ह्यामध्ये दरोडा खून दिवसाढवळ्या चोरी त्याचबरोबर जबर मारहाण त्यानंतर मारहाण करून व्हिडिओ सोशल माध्यमांवरती व्हायरल करणे असे प्रकार अद्यापही चालूच आहेत गेल्या दोन दिवसांमध्ये बीड जिल्ह्यामध्ये दोन ते तीन खून झाले असून त्या घटना ताज्या असताना बीड शहरातील पेठ बीड पोलीस स्टेशन हद्दीमधील प्रसिद्ध शैक्षणिक संकुलन असलेल्या आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दोन तरुणांमध्ये वाद झाला आणि वादाचे रूपांतर जबर मारहाणी मध्ये झाली एका तरुणांनी दुसऱ्या तरुणावरती चाकूने सपासप वार केले आहेत.

यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या अंगावरती हातावरती गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. यामध्ये आदित्य गाडे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे याप्रकरणी बीडच्या पेठ बीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींचा तपास पोलीस घेत आहेत.

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अस्थिकलश सांगलीमध्ये दाखल

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अस्थिकलश सांगलीमध्ये दाखल झाला आहे.सांगलीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयात हा अस्थीकलश

दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. सकाळपासून अस्थींचे दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादीसह इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.दिवसभर अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे,त्यानंतर सायंकाळी हरिपूर येथील कृष्णा व वारणा नदीच्या संगमावर अस्थींचे विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी दिली आहे.

Khed: खेड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर पुणे दादांच्या आठवणींनी एकवटलं

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींच्या तोंडावर अजित पवारांच्या अकाली निधनानंतर उत्तर पुणे जिल्ह्यात शोककळा पसरलीय राष्ट्रवादी काँग्रेसकडून खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात गावागावांत शोकसभांतुन पसायदान पठण केलं जातंय.

या सभांमध्ये ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असुन शोकसभेत पसायदान म्हटलं जात असून, दादांच्या आठवणींनी गावागावांत भावनिक वातावरण निर्माण झालंय.अजित पवारांचा उत्तर पुणे जिल्हा हा त्यांचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो.त्यांच्या जाण्याने हा किल्ला केवळ रिकामा नव्हे, तर भावनिकदृष्ट्या हादरलेला दिसतोय.गावागावातील नागरिक अजित पवारांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या कार्याला सलाम करत आहेत.

Ajit Pawar: अजित दादांचे अस्थिकलश दर्शनासाठी पिंपरी चिंचवड शहरात दाखल

पिंपरी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी अजित पवारांच्या अस्थी या नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिक अतिशय जड अंतःकरणाने अजित दादाच्या अस्थीच दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह अनेक जण भाऊक देखील झाले होते. अजित दादा आणि पिंपरी चिंचवड शहराचे नाते हे अतिशय जिव्हाळ्याचे होते आणि यामुळे अजित दादानी नेहमीच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आपल्या कडे ठेवल्याचे पाहायला मिळत होत. आज त्यांचे अस्थिकलश पाहून शहरवासीयांचे डोळे पाणावल्याचे पाहायला मिळाले.

Pankaja Munde: लातूरमध्ये पंकजा मुंडेंच्या दोन सभा, हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाड झाल्याने सभेला उशीर

लातूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अनुषंगाने भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांची आज लातूरच्या किनगाव आणि जानवळ या ठिकाणी जाहीर सभा होऊ घातली आहे, दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाड झाल्याने लातूर येथील नियोजित सभांना उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे,

Ajit Pawar: वाशिममध्ये अजित पवारांचे अस्थिकलश दाखल..

वाशिम जिल्ह्यात स्व. अजित दादा पवार यांचा अस्थिकलश दाखल झाला असून, मंगरूळपीर नंतर वाशिम शहरातील पाटणी चौकात नागरिकांना दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आला आहे. यावेळी अस्थिकलशचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर अस्थिकलश वाशिम नंतर रिसोड व मालेगाव येथे नेण्यात येणार असून, दुपारी ४ वाजता डव्हा चाका तीर्थ येथील काटेपूर्णा नदीच्या तीरावर विसर्जन करण्यात येणार आहे.

Pune: पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२.०५ वाजल्यापासून ते १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

Pune: महापौर निवडीसाठी लक्ष्मी आंदेकर ,सोनाली आंदेकरांना तुरुंगातून बोलावले जाणार

महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी लक्ष्मी आंदेकर ,सोनाली आंदेकर यांना तुरुंगातून बोलवला जाणार

राष्ट्रवादीच्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर यांना पहिल्या पालिकेच्या सर्वसाधारण मुख्य सभेला बोलवलं जाणार

नगरसचिवांकडून कारागृहाला पत्र पाठवले जाणार

नऊ तारखेला होणार पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा

पुणे महानगरपालिकेकडून लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर सर्वसाधारण सभेला हजर राहण्यासाठी पत्राचा ड्राफ्ट तयार करण्यात आला आहे .

सोबत राष्ट्रवादी पक्ष देखील दोघींना उपस्थित राहण्यासाठी पत्र देणार आहे

पहिल्या सर्वसाधारण सभेत मतदानासाठी आंदेकर उपस्थित राहणार

लक्ष्मी आंदेकर,सोनाली आंदेकर कोल्हापूर कारागृहात आयुष कोमकर त्या प्रकरणात शिक्षा भोगत आहेत.

Nagpur: नागपूरमध्ये काँग्रेसचा महानगरपालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा

नागपूर शहरातील अतिक्रमण विभागाने हातगाड्यांवर कारवाई केल्याच्या निषेधार्थ नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयावर काँग्रेस मोर्चा काढत आहे.

सत्तापक्ष नेते संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार..

या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात मोठा पोलिस बंदोबस्त.

Ajit Pawar Death: अजितदादांचा दशक्रिया विधी होणार नसल्याची माहिती

दिवंगत अजित दादांचा दशक्रिया विधी होणार नसल्याची माहिती

अस्थी विसर्जनाच्या दशक्रिया दिवशी विधी संपन्न झाल्याची माहिती

३० तारखेला झालेल्या अस्थी विसर्जन कार्यक्रमावेळी दशक्रिया विधी संपन्न झाल्याची माहिती

६ तारखेला अजित दादांच्या निधनाला १० दिवस होतात पूर्ण

Pune: पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित

पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित.

निवडणूक बिनविरोध होणार असल्याने निवडणूक औपचारिकता राहिली आहे.

सिंहगड रोडला प्रथमच महापौर पदाचा मान. नागपुरे सलग तिसऱ्यांदा नगरसेवक झाल्या, यंदाही निवडणूक त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या सभेसाठी कुडाळमध्ये जय्यत तयारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज जाहीर सभा संध्याकाळी ४.३० वाजता होणार आहे. या सभेला महायुतीचे सर्व जेष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळणार आहे.

निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आली असताना एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. या सभेकडे महायुतीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे

Pune: ज्या PDCC बँकेत राजकारणाची सुरुवात केली त्याच ठिकाणी अजित पवारांच्या अस्थी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काही दिवसांपूर्वी बारामती येथे विमान अपघातात निधन झालं.. अजित पवारांच्या अस्थि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभर दर्शनासाठी ठेवण्यात येत आहेत.. आज हाच अस्थी कलश पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवण्यात आला आहे.. याच PDCC बँकेतून अजित पवारांनी 1991- 92 साली आपल्या जिल्ह्यातील राजकारणाची सुरुवात केली होती..1992 पासून 2025 पर्यंत अजित पवार या बँकच्या वेगवेगळ्या पदावर कार्यरत होते. आज त्याच बँकेच्या प्रांगणात अजित पवार यांचे अस्थी कलश ठेवण्यात आले आहेत..

नागपूरातील नंदनवन परिसरात कॅफे जाळला!

आपसी वादातून कॅफे जाळल्याची माहिती

नंदनवन मेन रोड परिसरातील घटना

मध्य रात्री कॅफे संपूर्ण जळून खाक

आज पोलीस बंदोबस्त तैनात...

काल रात्री दोन गटात वाद झाल्यानंतर कॅफेला आग लावल्याची माहिती

मेहकरमध्ये मोठा अनर्थ टळला! हॉस्पिटलबाहेरील विद्युत डीपीला आग

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात आज मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. पाखरे हॉस्पिटलजवळ असलेल्या वीज वितरण कंपनीच्या विद्युत डीपीला अचानक आग लागली. डीपीजवळ वाहने उभी होती आणि शेजारीच हॉस्पिटल असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आली आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, वीज वितरण कंपनीच्या दिरंगाईवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

शरद पवारांचा दिल्ली दौरा रद्द!

शरद पवारांचा दिल्ली दौरा रद्द!

अधिवेशनासाठी जाणार होते दिल्लीला

आता मुंबईहून बारामतीला जाणार

हिट अँड रन अपघातातील जखमींची पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून \ विचारपूस

सांगली मध्ये घडलेल्या हिट अँड रन अपघात तील जखमींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी भेट घेतली आहे.सांगलीच्या शासकीय रुग्णालयामधील उपचार घेणाऱ्या जखमींची भेट घेत विचारपूस केली आहे. दोन दिवसांपूर्वी सांगलीतल्या मुख्य रस्त्यांवर हिट अँड रनचा थरारक प्रकार घडला होता.

धाराशिवमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सभा

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे सभा घेतली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक या सभेसाठी उपस्थित होते.भाजपा महायुतीच्या सर्व उमेदवारांना अधिकाधिक मतांनी विजयी करण्याचा आवाहन यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल आहे.

संस्कृती राम सातपुते यांचा चार महिन्याच्या बाळाला घेऊन प्रचार

सोलापूर जिल्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचार जोमात सुरू झाली आहे. माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते त्यांची पत्नी संस्कृती सातपुते या दहिगाव जिल्हा परिषद गटातून भाजपकडून निवडणुकीत रिंगणात उतरल्या आहेत. प्रचार करत असताना त्या आपल्या चार महिन्याच्या तान्ह्या बाळाला घेऊन त्या प्रचारात उतरल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या तुरीच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने लावली आग,आगीत 20 क्विंटल तूर जळून खाक

यवतमाळच्या नेर तालुक्यातील पांढरी येथील शेतशिवारातील गोवर्धन पवार यांनी त्यांच्या शेतात तूर काढून त्याची गंजी मारून ठेवली असतात अज्ञात व्यक्तीने रात्री दरम्यान तुरीच्या गंजीला आग लावल्याने संपूर्ण तुरीची गंजी जळून खाक झाली आहे.यामध्ये वीस क्विंटल तूर जळ्याचा अंदाज व्यक्त केल्या जात असून खरीप हंगामातील शेवटचे पीक तूर काढून घरी आणणार अशात अज्ञात व्यक्तीने तुरीच्या गंजीला आग लावली. या घटनेमुळे शेतकरी महिला आक्रोश करताय.

यवतमाळात अजित पवार यांचा अस्थी कलश

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थी कलश यवतमाळात आणण्यात आलय.शहरातील दारव्हा मार्गावरील हाऊसिंग फायनान्सच्या कार्यालयात हा कलश ठेवण्यात आला आहे. चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत येथे अस्थी कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर पाटील यांनी केले आहे.

कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार’ नाव देण्याचा ऐतिहासिक ठराव

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज) या संघाला "अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज"असे नामकरण करण्याचा ठराव नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे.

अजित दादांचे विमान अपघातात निधन झाल्याने संपूर्ण सहकार क्षेत्रात शोककळा पसरली असून, ही हानी पुणे जिल्ह्यातील दूध संघासाठी कधीही भरून न निघणारी असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली.अजित पवार यांनी सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले. संघाच्या वार्षिक सभेला ते उपस्थित राहिले होते. पवार कुटुंबाचे सहकार चळवळीला आणि संघाच्या विविध प्रयत्नांना सातत्याने सहकार्य मिळाले आहे. संघाच्या पायाभूत सुविधा आणि दीर्घकालीन नियोजनासाठी “संघाला बळकट करणे, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी संस्थात्मक उभारणीला प्राधान्य देणे आणि सहकारी संस्थांना सक्षम बनविणे या व्यापक दृष्टिकोनातून संघाला मिळालेले पाठबळ आम्ही कायम स्मरणात ठेवू,” अशी भावना संचालकांनी व्यक्त केली.

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ करणाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक होणार, पुणे पोलिसांचा पुणेकरांना सज्जड दम

पुणे शहरात दारू पिऊन वाहन चालविण्याच्या घटनांमुळे वाढत असलेले अपघात आणि बळी रोखण्यासाठी पोलिस प्रशासन अधिक कठोर पावले उचलणार असून, ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची पुनरावृत्ती झाल्यास सर्जिकल स्ट्राईक करत थेट वाहन जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे, अशी स्पष्ट भूमिका पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली. शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे शिवाजीनगर येथील मुख्यालयात सोमवारी रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत समुपदेशन व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या (ड्रंक अँड ड्राईव्ह) वाहनचालकांना मार्गदर्शन करताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते. दोनपेक्षा अधिक वेळा ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई झाल्यास संबंधित वाहन थेट जप्त करण्यात येणार आहे. याचबरोबर ट्रिपल सीट वाहनचालकांची वाढती संख्या लक्षात घेता, त्यांची वाहनेही जप्त केली जातील, असेही त्यांनी सांगितले.

पुण्यातील पोर्श अपघात प्रकरण

मौजमजेसाठी अल्पवयीन मुलाला कारच्या चाव्या देणे स्वीकारार्ह नाही, सर्वोच्च न्यायालयाने आरोपी पालकांच्या भूमिकेवर ओढले ताशेरे

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलांच्या अशा कृत्यांसाठी त्यांचे पालकच जबाबदार असून, मौजमजेसाठी मुलांच्या हातात कारच्या चाव्या आणि पैसे देणे अजिबात स्वीकारार्ह नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आरोपी पालकांच्या भूमिकेवर ओढले ताशेरे

Maharashtra Live News Update : पुण्यात भाजपा कोअर कमिटीची महत्वाची बैठक; महापौर पदावर कोणाची वर्णी? सस्पेन्स कायम

पुणे महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार निश्चित करण्याच्या दृष्टीने आज पुण्यात भाजपा कोअर कमिटीची महत्वाची बैठक पार पडली. ही बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या बैठकीत पुणे महापालिकेच्या महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या नावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महापालिकेतील सध्याची राजकीय स्थिती, पक्षातील अंतर्गत समीकरणे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच पुणे शहरातील राजकीय संतुलन लक्षात घेऊन संभाव्य नावांची चर्चा झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com