Ratnagiri Tourism : बोटीतून करा इतिहासाची सफर, १६व्या शतकातील 'हा' किल्ला पाहा

Shreya Maskar

सुवर्णदुर्ग

सुवर्णदुर्ग हा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णै बंदराजवळ अरबी समुद्रातील बेटावर वसलेला एक ऐतिहासिक अभेद्य जलदुर्ग आहे.

Fort | yandex

इतिहास

सुवर्णदुर्ग हा १६ व्या शतकातील किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये जिंकला होता, जो नंतर कान्होजी आंग्रे या मराठा आरमाराचे प्रमुख यांचा मुख्य तळ बनला.

Fort | yandex

किनारी किल्ले

कोकण किनारपट्टीवरील सुवर्णदुर्गच्या सुरक्षिततेसाठी कनकदुर्ग, फत्तेदुर्ग (फत्तेगड) आणि गोवागड हे तीन किनारी किल्ले उभारण्यात आले होते. हे किल्ले मुख्यत्वे सागरी आक्रमणांपासून सुवर्णदुर्गाचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते.

Fort | yandex

मजबूत तटबंदी

सुवर्णदुर्ग हा एक भक्कम जलदुर्ग आहे. या किल्ल्याची तटबंदी साधारणपणे ३० फूट उंच असून, ती अभेद्य अशी आहे, जी आजही ४०० वर्षांनंतरही उभी आहे.

Fort | yandex

तटबंदीचे वैशिष्ट्ये

सुवर्णदुर्गाची तटबंदी पूर्णपणे जांभ्या दगडाचा वापर करून बांधलेली आहे. यावर विविध बुरुज, चोरदरवाजा आणि प्राणी-पक्ष्यांची शिल्पे आहेत.

Fort | yandex

कसं जाल?

दापोली जवळील हर्णै बंदरातून खाजगी बोटीने सुवर्णदुर्गावरजाता येते. हा सागरी किल्ला बेटावर वसलेला असून, हर्णै बंदरावरून १५-२० मिनिटांच्या बोट प्रवासात पोहोचता येते.

Fort | yandex

कधी जावे?

तुम्ही येथे सुंदर फोटो काढू शकता. लहान मुलांना येथे मजा-मस्ती करायला मिळेल. हिवाळ्यात येथे आवर्जून भेट द्या.

Fort | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | yandex

NEXT : हिमालयाच्या कुशीत वसलेले सुंदर हिल स्टेशन, हनिमूनसाठी 'हे' ठिकाण ठरेल बेस्ट

Honeymoon Destination | yandex
येथे क्लिक करा...