टिपू सुलतान यांचे नाव क्रीडा संकुलाला देण्यावरून सुरु असलेला वाद आहे तरी काय?

मालाड मधील मालवणी भागात एका क्रीडा संकुलाला दिलेल्या टिपू सुलतान या नावावरून मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.
Tipu Sultan
Tipu Sultan SaamTVNews
Published On

मुंबई : मालाड मधील मालवणी भागात एका क्रीडा संकुलाला दिलेल्या टिपू सुलतान या नावावरून मुंबईतील (Mumbai) राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. पण कधी काळी या नावाला आज विरोध करणारेच हे नाव देण्याची मागणी करत होते, असं आता अस्लम शेख (Aslam Shaikh) आणि महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी म्हटलंय. नेमकं कोणी आणि कुठे टिपू सुलतानचं नाव देण्याची मागणी केली होती? त्याविषयीच हि सविस्तर बातमी.

हे देखील पहा :

मुंबईतल्या मालाड (Malad) मधील मालवणी परिसरात एक क्रीडा संकुल म्हाडाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेले आहे. या क्रीडा संकुलाचं उद्घाटन असलम शेख यांनी आज केलं. या क्रीडा संकुलाला वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल असं नाव देण्यात आल्यामुळे भारतीय जनता पक्ष (BJP) गेल्या दोन दिवसापासून आक्रमक झालाय. उद्घाटनाआधी भाजप आणि बजरंग दलाकडून आंदोलन देखील केलं गेलं. पण, आज या नावाला विरोध करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने 'टिपू सुलतानचं नाव मुंबईतील एका रस्त्याला देण्याची मागणी केली होती', असा दावा पालकमंत्री असलम शेख यांनी केला आहे.

Tipu Sultan
बनायचं होत डॉक्टर, बनला खुनी; एका चापटचा बदला मित्राचा खून करून घेतला!

टिपू सुलतान (Tipu Sultan) च्या नावाला भारतीय जनता पक्षाने विरोध केला आहे. खरंतर या आधी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी इथल्या मैदानाला भेट दिली होती. तेव्हा टिपू सुलतान असे त्यांनी म्हटले असल्याचे इथले स्थानिक लोक सांगतात. पण, अधिकृत रित्या या मैदानाला हे नाव सरकार दरबारी तरी देण्यात आलेलं नाही. पण, मग अधिकृत रित्या एका रस्त्यालाच टिपू सुलतानचं नाव देण्याची मागणी भाजपने केली होती. या असलम शेख यांच्या दाव्याची पडताळणी केली असता एक माहि

Tipu Sultan
शिरूर हादरलं! विधवा महिलेवर आठ जणांकडून सामूहिक बलात्कार

ती समोर आलीय. खुद्द महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत माहिती समोर आणलीय. भाजपाचे सध्याचे आमदार आणि तत्कालीन नगरसेवक अमित साटम यांनी २०१३ मध्ये एम पूर्व वॉर्ड इथल्या बाजीप्रभू देशपांडे चौका पासून सुरु होणाऱ्या रफिक नगर नाल्यापर्यंत जाणाऱ्या शिवाजीनगर मार्ग क्रमांक चारला 'टिपू सुलतान मार्ग' असं नाव देण्याच्या प्रस्तावाला अनुमोदन दिलं होतं. तर दुसऱ्या बाजूला भवन्स महाविद्यालय पासून शेर-ए-टिपू सुलतान असं नाव देण्याची मागणी तत्कालीन नगरसेवक विठ्ठल खरटमोल सूचक म्हणून केली. त्याला अनुमोदन मोहसीन हैदर यांनी दिलं आहे. या दोन रस्त्यांना नाव देण्यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या (BMC) मिनिट्स मध्ये नोंद आहे .

Tipu Sultan
कस्टडीत पोलिसांनी लैंगिक छळ केला; आरोपीच्या तक्रारीने अकोल्यात खळबळ

टिपू सुलतान हे नाव द्यावं की नाही हा वादाचा मुद्दा आहे. या नावावरून भाजपकडून केल्या जाणाऱ्या विरोधामुळे भाजप हा विकास विरोधी असल्याचं अस्लम शेख म्हणतायत. पण, दुसरीकडून या नावाला तीव्र विरोध करणाऱ्या भाजपचे सध्याचे आमदार आणि तत्कालीन नगरसेवक आणि माजी नगरसेवकांनीच हे नाव मुंबईतल्या दोन रस्त्यांना देण्याची आधी मागणी केल्यामुळे भाजपचा नेमका विरोध कशाला आहे? असा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे आता भाजप यावर काय उत्तर देणार, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com