लातूर : लातूर शहरात तीन दिवसापूर्वी झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या खुनाचा उलगडा झाला असून अल्पवयीन आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मित्राने चारचौघात मारलेल्या चापटेचा बदला घेण्यासाठी खून (Murder) केल्याचं अल्पवयीन आरोपी मुलाने कबुल केलं असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी सांगितले आहे.
हे देखील पहा :
लातूर (Latur) शहरात 23 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विशाल नगर भागातील साई मंदिराजवळ 18 वर्षीय रोहन सुरेश उजळंबे या मुलाचा कत्तीने वार करून खून केल्याची घटना घडली होती. मयत रोहन याने त्याच्या अल्पवयीन मित्राला चारचौघात चापट मारली होती. त्याचा बदला घेण्याचा राग अल्पवयीन आरोपीच्या मनात होता.
त्यात अल्पवयीन आरोपीचा एक भाऊ खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात (Jail) असून त्याच्या विचारांचा प्रभाव असल्याने अल्पवयीन आरोपीने कारस्थान रचून रोहनचा खून केला. मयत रोहन दुचाकीवरून शहरात फिरून साई मंदिराजवळ आला असता, आरोपीने शर्टाच्या मागे लपवून ठेवलेली कत्ती काढून रोहनवर 5 ते 6 वार केले. त्यात रोहन गंभीर जखमी झाला होता.
अखेर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अल्पवयीन आरोपी मुलगा हा 12 विज्ञान वर्गात शिकत असून त्याला डॉक्टर (Doctor) बनायचं होतं. तो नीट परीक्षेची तयारी देखील करत होता. विशेष म्हणजे दहावीला अल्पवयीन आरोपीला 94 % मार्क होते. भविष्यात तो डॉक्टर बनला असता पण चुकीच्या व्यक्तीला आदर्श मानल्याने रागाच्या भरात डॉक्टर बनण्याऐवजी खुनी बनला.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.