Rupali Thombare On Jitendra Awhad Saam TV
मुंबई/पुणे

Rupali Patil Thombare: मी घाबरणार नाही, माझ्याविरोधातील गुन्हा खोटा; रूपाली ठोंबरे आक्रमक

Rupali Thombare On Jitendra Awhad: माझ्याविरोधात बीडमध्ये दाखल केलेला गुन्हा खोटा असून मी कोणालाही घाबरणार नसल्याचे रुपाली ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांना खडसावून सांगितले आहे.

Priya More

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ट्वीट केल्याप्रकरणी अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरेंविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्वीट करत रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली. पण यावर प्रतिक्रिया देताना रूपाली ठोंबरे यांनी 'माझ्याविरोधात बीडमध्ये दाखल केलेला गुन्हा खोटा आहे.', असा आरोप केला. तसंच मी कोणालाही घाबरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

साम टीव्हीशी बोलताना रूपाली ठोंबरे यांनी सांगितले की, 'माझ्या विरोधात बीडमध्ये केलेला गुन्हा खोटा आहे. एफआयआरमध्ये ज्यांच्याबद्दल बदनाम झालं असं म्हणतात त्यांचं नावच नाहीये. जितेंद्र आव्हाड यांनी नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. पण मी घाबरणार नाही. मी स्वतः बीडमध्ये जाऊन पोलिसांशी चर्चा करणार आहे.' जितेंद्र आव्हाड यांची बदनामी केल्याप्रकरणी रूपाली ठोंबरे यांच्याविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपाली ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांचा फोटो असलेले चॅट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत केले होते. यावरून सध्या जितेंद्र आव्हाड आणि रूपाली ठोंबरे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. या पोस्टनंतर जितेंद्र आव्हाड यांच्या तक्रारीनंतर रूपाली ठोंबरे यांच्याविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रुपाली ठोंबरे यांच्यासह विक्रांत फड, रेखा फड , कृष्णा धानोरकर, बिभीषण अघाव, आकाश चौरे आणि सौरभ आघाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील वादग्रस्त चॅट रुपाली ठोंबरे यांनी ट्वीट केले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत कर नाही और डर कशाला? असे म्हणत पोस्ट शेअर केली. त्यांनी या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'माझा खोटा व्हॉटसॲप चॅटचा वायरल करणाऱ्यांविरुद्ध काल रात्री मी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा (एफआयआर) दाखल केला. कर नाही और डर कशाला?'

तसंच,'फक्त अपेक्षा एवढीच आहे की, हा व्हॉटसॲप चॅटचा स्क्रीनशॉट कसा खोटा (मॉर्फ केलेला ) आहे, याची संपूर्ण माहिती मी ट्वीटद्वारे (एक्स पोस्टद्वारे) दिली आहे. त्याचा वापर केला तर पोलिसांना, ' चौकशी सुरू आहे', हे सांगण्याचे कारणच उरणार नाही. मी स्वतःच सर्व तांत्रिक बाबी माझ्या ट्वीटमध्ये सांगितलेल्या माहितीचा वापर केला तर पोलिसांना फक्त कारवाईच करायची आहे.', असे आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. पण आता रूपाली ठोंबरे यांनी माझ्याविरोधात दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठवाड्यात मोठा राजकीय भूकंप, अजित पवार अन् शिवसेनेला धक्का, भाजपची ताकद वाढली

Piles pain relief: आता 5 मिनिटांत पाईल्सच्या वेदनांपासून होईल मुक्तता; डॉक्टरांनी सांगितला एक उत्तम आणि सोपा उपाय

Vijay Wadettiwar: हे पॅकेज शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाच्या खाईत लोटणारं - विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर आरोप|VIDEO

Arvind Sawant : राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा उबाठाचा निर्णय पक्का; हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर अरविंद सावंत यांचे वक्तव्य

Maharashtra Politics: शरद पवारांना मोठा धक्का! विश्वासू नेता सोडणार साथ

SCROLL FOR NEXT