Jitendra Awhad: चॅट माझं हे सिद्ध करा, नाहीतर माफी मागा; आव्हाडांचं रूपाली ठोंबरेंना आव्हान

Awhad Vs Rupali Thombare: संतोष देशमुख यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक व्हाट्सअप चॅट समोर आले होते. त्यावरून आव्हाड यांनी रुपाली ठोंबरे यांना आव्हान दिलंय.
Jitendra Awhad
Awhad Vs Rupali ThombareSaam Tv
Published On

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने महाराष्ट्र ढवळून निघालाय. आता संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा, यासाठी निघालेल्या मोर्चाच्या अनुषंगाने, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे एक खळबळजनक व्हाट्सअॅप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत रुपाली ठोंबरेंना आव्हान दिलंय. अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी हे स्क्रीन शॉट सोशल मीडियावर शेअर केले होते.

... नाहीतर माफी मागा- जितेंद्र आव्हाड

रुपाली पाटील ठोंबरे यांनी ती माझीच चॅटिग असल्याचं सिद्ध करून दाखवावं. जर त्यांनी सिद्ध केलं तर मी आमदारकीचा राजीनामा देईल. पण जर त्यांनी सिद्ध केलं नाही तर त्यांनी माफी मागावी असं आव्हान शरद पवार गट राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलंय. बीडमध्ये निघालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोर्चाच्या अनुषंगाने, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं एक सोशल मीडियावरील चॅट वायरल झालं होतं.

Jitendra Awhad
Jitendra Awhad : राज्यात महाविकास आघाडीच सरकार येईल; जितेंद्र आव्हाड यांचा विश्वास

तर या चार्टचे स्क्रीन शॉट अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र हे चॅट आपले नाहीत, ते पूर्णपणे बोगस आहेत, बनावट आहेत. कोणीतरी जाणीवपूर्वक सोशल मीडियावर ते व्हायरल केले आहेत, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलीय.

Jitendra Awhad
Maharashtra Politics : शरद पवार गटाची महत्वाची बैठक; पक्षाने जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

दरम्यान जर सोशल मीडियावर व्हायरल झालेले चॅट माझ्या मोबाईल मधून झाले असल्याचं रुपाली ठोंबरे म्हणतात. पण हे रूपाली पाटील यांनी सिद्ध केले तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो. जर सिद्ध नाही केलं तर रूपाली पाटलांनी माफी मागावी, असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे.

काय होतं व्हायरल चॅट

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा, यासाठी निघालेल्या मोर्चाच्या अनुषंगाने, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे एक खळबळजनक व्हाट्सअप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले होतं. आज बीडला येण्यापूर्वी जितेंद्र आव्हाडांनी बीड येथील शरद पवार गटाच्या एका कार्यकर्त्याला, व्हाट्सअॅपवरून मेसेज केलाय. हेच चॅट सोशल मीडियावर लीक झाले होते.

यामध्ये म्हटलंय, की "सर्व मसाला तयार करून ठेव मुंडे विरोधात आणि वाल्मीक विरोधात जे जे असेल ते सर्व गोळा कर, हवे तेवढे पैसे मी देतो. मोर्चामध्ये मुस्लिम आणि दलितांना गोळा कर त्यासाठी हवे तेवढे पैसे मी देतो, आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार हा माझा माणूस आहे, त्यालाही मोर्चाच्या वेळी भाषणाची संधी द्या. हा मुंडे आता कसा मंत्री राहतो आणि याला अजित पक्षात कसा ठेवतो तेच मी बघतो" अशा स्वरूपाचे चॅट व्हायरल झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नेत्या ऍड. रूपाली ठोंबरे पाटील यांनी या चॅटचे स्क्रीन शॉट आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केले असून जितेंद्र आव्हाड यांना हे गलिच्छ राजकारण करण्यामागचा उद्देश विचारला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com