Rupali Patil Thombare: जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त चॅट व्हायरल प्रकरण, रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Case Register Against Rupali Patil Thombare: जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ट्वीट केल्याप्रकरणी रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्वीट करत रुपाली ठोंबरेंवर टीका केली.
Rupali Patil Thombare: जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त चॅट व्हायरल प्रकरण, रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
Rupali Patil Saam tv
Published On

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त चॅट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अजित पवार गटाच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे यांनी हे व्हॉट्सअप चॅट सोशल मीडियावर पोस्ट केले होते. याप्रकरणी आता रुपाली ठोंबरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रुपाली ठोंबरेंविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली ठोंबरेंसह ७ जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ट्वीट केल्याप्रकरणी रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. रुपाली ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांचा फोटो असलेले चॅट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत जितेंद्र आव्हाड कशाप्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न रुपाली ठोंबरे करत असल्याचे आव्हाडांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.

या तक्रारीनंतर रूपाली ठोंबरे यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रुपाली ठोंबरे यांच्यासह विक्रांत फड, रेखा फड , कृष्णा धानोरकर, बिभीषण अघाव, आकाश चौरे आणि सौरभ आघाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील वादग्रस्त चॅट रुपाली ठोंबरे यांनी ट्वीट केले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी देखील रुपाली ठोंबरेंना प्रत्युत्तर देत ते खोटे असल्याचे सांगितले.

यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत कर नाही और डर कशाला? असे म्हणत पोस्ट शेअर केली. त्यांनी या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'माझा खोटा व्हॉटसॲप चॅटचा वायरल करणाऱ्यांविरुद्ध काल रात्री मी बीडमधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा (एफआयआर) दाखल केला. कर नाही और डर कशाला?'

Rupali Patil Thombare: जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त चॅट व्हायरल प्रकरण, रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
Jitendra Awhad : राज्यात महाविकास आघाडीच सरकार येईल; जितेंद्र आव्हाड यांचा विश्वास

तसंच, 'फक्त अपेक्षा एवढीच आहे की, हा व्हॉटसॲप चॅटचा स्क्रीनशॉट कसा खोटा (मॉर्फ केलेला ) आहे, याची संपूर्ण माहिती मी ट्वीटद्वारे (एक्स पोस्टद्वारे) दिली आहे. त्याचा वापर केला तर पोलिसांना, ' चौकशी सुरू आहे', हे सांगण्याचे कारणच उरणार नाही. मी स्वतःच सर्व तांत्रिक बाबी माझ्या ट्वीटमध्ये सांगितलेल्या माहितीचा वापर केला तर पोलिसांना फक्त कारवाईच करायची आहे.', असे आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

'उद्याचा मसाला तयार ठेव शिवराज..मी पहिली तुझी भेट घेईन, त्यानंतर मोर्चाकडे... मुंडेंविरोधात आणि वाल्याविरोधात (वाल्मिक कराड) जे जे असेल ते सर्व गोळा कर पैसे लागले तर मला फोन कर, पण मटेरियल तयार ठेव... तुझा फोन लागत नाहीये सकाळपासून प्रयत्न करतोय.', हे व्हॉट्सअप चॅट जितेंद्र आव्हाडांच्या नावाने व्हायरल होत आहे.

Rupali Patil Thombare: जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त चॅट व्हायरल प्रकरण, रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
Jitendra Awhad: अजित पवार गट ही पाकीटमारांची टोळी, टीका करतांना जितेंद्र आव्हाडांची जीभ घसरली

तसंच, 'मोर्चात मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा, पैशांची काळजी करु नका...आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे, त्याला ही संधी द्यावी, मी सांगितलं आहे, कसं काय कुणावर बोलायचं...कसा मंत्री राहतो आणि अजित (अजित पवार) याला कसा पक्षात ठेवतो ते बघू आता.', अशाप्रकारचा देखील जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने व्हॉट्सअप चॅट व्हायरल होत आहे. हे व्हायरल झाल्यानंतर आव्हाडांनी ते फेक कसं आहे हे सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले.

Rupali Patil Thombare: जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त चॅट व्हायरल प्रकरण, रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
Jitendra Awhad On Prakash Ambedkar: लग्न एकाशी आणि हुंडा दुसऱ्याकडून...; प्रकाश आंबेडकरांच्या टीकेवर आव्हाडांचं प्रत्युत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com