रुपाली पाटील ठोंबरे यांचा मनसेला रामराम, राष्ट्रवादी पक्षात करणार प्रवेश? Saam Tv
मुंबई/पुणे

रुपाली पाटील ठोंबरे यांचा मनसेला रामराम, राष्ट्रवादी पक्षात करणार प्रवेश?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पक्षातील सर्व पदांचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil-Thombare) यांनी पक्षातील सर्व पदांचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याकडे मनसेच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. त्यामुळे ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुणे (Pune) शहरात मोठे खिंडार पडले आहे. रुपाली पाटील या मनसेच्या एक निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.

हे देखील पहा-

विशेष म्हणजे राज ठाकरे (Raj Thackeray) उद्या पुणे (Pune) दौऱ्यावर येत आहेत. पुढील दोन दिवस राज ठाकरे आहेत पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्याआधीच पाटील यांनी राजीनामा दिला आहे. मी काल मनसेचा सदस्याचा आणि जे पद आहे त्याचा राजीनामा दिला. राज ठाकरे माझ्या कायम हृदयात होते आणि राहतील. मी संघर्ष करणारी आणि सर्वसामान्य कार्यकर्ती आहे. मला कोणताही राजकीय वारसा नाही, राज ठाकरेंना पाहूनच मी राजकारणात आले आहे.

मनसे मध्ये निस्वार्थी कार्यकर्ते आहे, त्यांनी मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यांची ऋणी राहीन, बदल कोणात घडत नसेल तर मी माझा बदल केलेला आहे. 14 वर्ष मी काम केले आहे, मनधरणी अनेकांनी केली. नवीन पक्षात जाणार हे अद्याप मी ठरवलेले नाही, अनेकांच्या ऑफर आलेल्या आहेत, निर्णय लवकरच जाहीर करणार आहे. राज ठाकरे माझे दैवत होते आणि आहेत. 14 वर्ष काम करत असताना मला तारेवरची कसरत करावी लागली.

माझ्यामुळे पक्षाला त्रास होणार असेल, तर मी माझा निर्णय घेतलेला बरा आहे. 14 वर्षात पक्षाने मला खूप काही दिले आहे. माझा वाद यावरुन नाही की मला काय दिले आणि काय दिले नाही माझ्या वैयक्तिक कारणासाठी मी राजीनामा दिला आहे. माझ्या काम करण्याच्या पद्धतीसह जे मला स्वीकारतील त्या पक्षात मी जाणार आहे. आता राष्ट्रवादी आणि शिवसेना समोर आहे. मला जर जायचं असतं तर 2019 ला मी निर्णय घेतला असता.

माझ्यावर ही वेळ का आली याची कल्पना तुम्हालाही माहिती आहे. त्याबद्दल मला काहीही बोलायचे नाही. भाजपची अद्याप ऑफर नाही. मी बेधडक होते आणि आहे. पक्ष सोडण्याच्या भावना इमोशनल आहेत. रिकामटेकड्या नेत्यांमुळे रुपाली पाटीलवर ही वेळ आली त्यांना योग्य वेळी उत्तर देईल, राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. फोन आल्यावर बघू, राज ठाकरेंना भेटायला कधीही आवडेल.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT