
उद्धव ठाकरे हे 'युज अँड थ्रो' करणारे नेते आहेत, अशी टीका भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केलीय. ठाकरे बंधूंच्या विजयी मिळाव्यानंतर दरेकर यांनी ही टीका केलीय. उद्धव ठाकरेंनी किती जणांना युज अँड थ्रो केलं. याची यादी वाचली तर वेळ कमी पडेल. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला त्यांचा महापौर बनवण्याची संधी दिली. पण उद्धव ठाकरेंनी त्यांची साथ सोडली. गेल्या २० वर्षात राज ठाकरेंकडे पाहण्यास उद्धव ठाकरेंना वेळ नव्हता, मात्र आज त्यांना सन्मानीय म्हणत आहेत, असं म्हणत प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं.
महायुती सरकारने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर आज ठाकरे बंधूंनी विजयी मेळावा घेतला. वरळीतील डोम येथे झालेल्या विजयी मेळाव्यात ठाकरे गट शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या तोफ डागली. उद्धव ठाकरेंच्या टीकेला आता भाजपकडून उत्तर दिलं जात आहे. भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.
उद्धव ठाकरेंनी कामासाठी युती केलीय. त्यांनी किती जणांना यूज अँड थ्रो केलं, त्याची यादी वाचली तर वेळ कमी पडेल. देवेंद्र फडणवीसांमुळे मुंबईत शिवसेनेचा महापौर बसला. नाहीतर भाजपचा महापौर झाला असता. मात्र मोठ मन आणि औदार्य दाखवून देवेंद्र फडणवीस यांनी पहारेकऱ्याची भूमिका घेतली आणि शिवसेनेला महापौर बनवण्याची संधी दिली. पण त्यानंतर उद्धव ठाकरेंनी युज अँड थो केलं.
उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळ, नारायण राणे, रामदास कदम, दिवाकर रावते यांचाही वापर केला आणि नंतर त्यांची साथ सोडली. इतकेच नाही तर त्यांनी राज ठाकरेंचा सुद्धा वापर करून घेतला आणि नंतर त्यांची साथ सोडली. उद्धव ठाकरेंना २० वर्ष राज ठाकरेंकडे बघायची देखील उसंत नव्हती. पण आज त्यांना सन्मानीय राज ठाकरे बोलावं लागलं. यात उद्धव ठाकरेंचा सत्तेसाठी असणारा स्वार्थीपणा दिसून येतोय, असं दरेकर म्हणाले.
राज आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली असून ते पुढील निवडणुका सोबत लढवतील अशी चर्चा सुरु झालीय. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं सत्ताधाऱ्याचे धाबे दणाणले आहे. त्यांच्या युतीचा भाजपला फटका बसणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यावर प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. महाराष्ट्रातला मराठी माणूस कुठल्या एका पक्षाला मतदान करत नाही. विधानसभा निवडणुकीत प्रचंड जनाधार महायुतीला मिळाला होता. मुंबईत भाजप, एकनाथ शिंदेंचे आमदार निवडून आले आहेत. उद्धव ठाकरेंना त्यांच्या स्वार्थासाठी मराठी माणूस आठवलाय, असं दरेकर म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.