अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंवर आज दुर्दैवी प्रसंग ओढवला. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या गटाला घेऊन जाणाऱ्या पाच बसची रामबन जिल्ह्यातील चंदरकोट लंगर स्थळाजवळ शनिवारी सकाळी समोरासमोर धडक झाली, ज्यामध्ये किमान ३६ यात्रेकरू किरकोळ जखमी झाले.
ही घटना सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली जेव्हा ताफ्याच्या शेवटच्या बसचे ब्रेक निकामी झाले आणि ती समोर उभ्या असलेल्या इतर चार बसला धडकली. रामबनचे पोलिस उपायुक्त मोहम्मद इलियास खान म्हणाले, “आज सकाळी, ताफ्यातील शेवटची बस नियंत्रण गमावून चार वाहनांना धडकली. सुमारे ३६ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.
त्यांना ताबडतोब जिल्हा रुग्णालयात रामबन येथे दाखल करण्यात आले”. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रफी यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. घडलेल्या घटनेनंतर प्रशासन आणि पोलिस पथकाने तातडीने बचाव आणि मदत कार्य सुरू केले.
जखमींना रुग्णालयात हलवले असुन चार नुकसान झालेल्या बस सुध्दा बदलण्यासाठी नवीन वाहने पाठवली जेणेकरून यात्रा अखंडित सुरू राहावी. प्रवाशांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पूर्ण व्यवस्था केली. असे म्हटले जात आहे की चौथ्या तुकडीत, एकूण ६,९७९ प्रवासी भगवती नगर येथून निघाले, त्यापैकी काही पहलगाम मार्गाने आणि काही बालटाल मार्गाने जात होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.