चर्चेला उधाण : खासदार उदयनराजे दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला

भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली.
चर्चेला उधाण : खासदार उदयनराजे दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला
चर्चेला उधाण : खासदार उदयनराजे दिल्लीत शरद पवारांच्या भेटीलाSaam Tv
Published On

सातारा : जिल्हा बॅंकेची नुकतीच निवडणूक (District Bank Election) पार पडली आहे. त्यामुळे अजून देखील साताऱ्यात 'राजकीय रंग' बघायला मिळत आहे आणि त्यातच भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आज दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची सदिच्छा भेट घेतली आहे.

यावेळी त्यांनी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिले असले तरी, या भेटीमधून आगामी काळात वेगळी राजकीय समीकरणे सातारा (Satara) जिल्ह्यामध्ये उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासदार उदयनराजेंनी लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे सातारा लोकसभेची पोटनिवडणूक (Lok Sabha By-Election) झाली.

हे देखील पहा-

यामध्ये उदयनराजे यांना पराभव पत्करावा लागला होता, तर राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) सातारा लोकसभेचे खासदार झाले होते. उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडली असली तरी त्यांची शरद पवार यांच्यावर असलेले प्रेम आणि जवळीक संपली नाही. मध्यंतरी शरद पवार आजारी होते. त्यावेळेस उदयनराजेंनी पुण्यात त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. त्यामुळे शरद पवार आणि उदयनराजे यांचे वेगळे नाते निर्माण झाले आहे.

सध्या सातारा पालिका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी शरद पवार यांची घेतलेली ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. मध्यंतरी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर (Vikram Pawaskar) यांनी फलटण मधील कार्यक्रमामध्ये साताऱ्याचा खासदार निंबाळकर यांच्या सारखा असावा, असे वक्तव्य केले होते. यावरून उदयनराजेंविषयी भाजपमध्ये नाराजी असल्याचे चित्र बघायला मिळत होते.

चर्चेला उधाण : खासदार उदयनराजे दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला
म्हाडा पेपरफुटी प्रकरण; पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका कोऱ्या ठेवण्याची सूचना

त्यानंतर या चुकीच्या वक्तव्यावर खासदार निंबाळकर यांनी मी माढा मतदारसंघातूनच (Madha constituency) लढणार असून साताऱ्यामधुन उदयनराजे हेच खासदारकीसाठी योग्य आहेत, असे सांगून पावसकर यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे स्पष्ट केले होते, तर खासदार उदयनराजे यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही, पण त्यांच्या मनाला ही गोष्ट लागली आहे.

मात्र, त्यांनी यावर कोणती देखील प्रतिक्रिया देणे टाळले होते. संसदेच्या अधिवेशनाकरिता खासदार उदयनराजे भोसले सध्या दिल्लीमध्ये मुक्कामी आहेत. आज दिल्लीमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिले आहेत. तसेच त्यांनी विविध विषयांवर चर्चा केल्याचे समजत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com