Rupali Chakankar VS Rupali Thombre Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: दादांच्या लाडक्या बहिणी भिडल्या; रुपाली चाकणकर की रुपाली ठोंबरे, कोणाला मिळणार आमदारकीचं गिफ्ट?

Rupali Chakankar VS Rupali Thombre : राज्यपाल नियुक्त 12 जागा महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रिक्त आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे या 12 जागांवर नियुक्ती केली जाण्याची शक्यता बळावली आहे.

Girish Nikam

राज्यपाल नियुक्त 12 जागा महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रिक्त आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे या 12 जागांवर नियुक्ती केली जाण्याची शक्यता बळावली आहे. महायुतीत भाजपाला 6, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा असा फॉम्युर्ला ठरल्याची माहिती मिळते आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी तीन नावांची शिफारस केली जाणार आहे. रूपाली चाकणकर, सिद्धार्थ कांबळे आणि आनंद परांजपे यांची नावे चर्चेत आहेत. ओबीसी, एससी घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न आहे. मात्र रूपाली चाकणकर यांचं नाव पुढे आल्यामुळे दादांच्या पक्षातली धुसफूस चव्हाट्यावर आलीय. मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी चाकणकरांच्या नावाला आक्षेप घेतलाय.

चाकणकर यांच्याकडे महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि महिला प्रदेशाध्यक्ष, अशी दोन पद आहेत. त्यामुळे त्यांना आमदारकीही दिली तर एकाच व्यक्तीला किती पदं असा सवाल ठोंबरेंनी सोशल मीडियावर जाहीररित्या उपस्थित केलाय. त्यामुळे हा वाद चव्हाट्यावर आला. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ट्विट करत रुपाली ठोंबरे-पाटील यांची कानउघडणी केलीय.

यावरच आपली प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, ''राज्यपाल नियुक्त जागेसाठी निर्णय झाला नाही. संसदीय मंडळाच्या बैठकीत नाव ठरणार आहे. संसदीय मंडळाच्या बैठकीपूर्वी माध्यमांमध्ये आपलं मत आणि प्रतिक्रीया देऊ नये.''

मात्र राज्यपाल नियुक्त आमदराकीवरून दादांच्या लाडक्या बहिणी भिडल्याचं चित्र समोर आलंय. आता दादा कोणत्या 'लाडकी बहिणी'ला आमदारकीचं गिफ्ट देणार याची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT