Maval News : मावळमध्ये अजित पवार गटात पडणार फूट? सुनील शेळकेंना राष्ट्रवादीमध्ये विरोध!

Maval Vidhan Sabha : आगामी विधानसभा निवडणुकीत मावळमधून कुणाला तिकिट मिळणार? याबाबत पुण्यात चर्चा सुरु आहे.
अजित पवार
अजित पवार, Ajit Pawar ,NCPSaam Tv
Published On

दिलीप कांबळे, साम प्रतिनिधी मावळ

Maval Assembly constituency : मावळ तालुक्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावटपासंदर्भात बैठकांवर बैठका सुरु आहेत. प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. त्याशिवाय प्रत्येक मतदारसंघातून इच्छूकांची यादी मोठी आहे. त्यामुळे तिकिट कुणाला मिळणार,याचा पेच कायम आहे. मावळ मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. मावळ मतदारसंघातून बापू भेगडे यांनी विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. साम टिव्हीसोबत बोलताना त्यांना तसा इशाराही दिलाय.

महायुती मधील भाजपने मावळ विधानसभेच्या जागेवरती दावा केला आहे. तर विद्यमान आमदार सुनील शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत. त्यामुळे मावळ विधानसभा कुणाकडे जाणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. अजित पावारांकडे मावळ जाणार का? असा प्रश्न असतानाच आता अजित पवार यांच्यापुढे नवा पेच निर्माण झाला आहे. सुनील शेळके विद्यमान आमदार आहेतच. त्यांना तिकिट मिळणार, असा अंदाज वर्तवला जात होता. पण बापू भेगडे यांनी आपण इच्छूक असल्याचं सांगत दावा ठोकला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय.

अजित पवार
Video: मावळ विधानसभेवर भाजपचा दावा, आमदार सुनील शेळकेंची भाजपवर नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्येच मावळ विधानसभेच्या जागेवरुन कलगीतुरा रंगू लागला आहे. कारण मावळ विधानसभेच्या जागेवरती अजित पवार गटातीलच मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते बापू भेगडे यांनी देखील दावा केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मावळ विधानसभेची उमेदवारीची मागणी केली असल्याची कबुली बापू भेगडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. त्यामुळे सध्या मावळ विधानसभेच्या जागेवरती केवळ भाजपच नव्हे तर अजित पवार गटामध्ये देखील चुरस असल्याचे पाहायला मिळत आहे.

विद्यमान आमदारावर टीका -

मावळमध्ये सुनील शेळके कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत. याबद्दल तळेगावचे राष्ट्रवादी अध्यक्ष संतोष भेगडे यांनी सुनील शेळके यांच्यावरती ताशेरे ओढले होते. यावरून बापू भेगडे यांनीही सर्व अजित पवारांच्या कानावर घातले असल्याचे सांगितले. त्याशिवाय यावेळी त्यांनी शेळके यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. आपल्या कार्यकर्त्यांना सूचनाही केली.

सोशल मीडयाद्वारे कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत काही पोस्ट सुरू होत्या. तर त्याविषयी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन यावेळी बापू भेगडे यांनी केले. त्याशिवाय आपण विधानसभेला इच्छूक असल्याचेही त्यांनी सांगितले.

अजित पवार
Maharashtra Politics: 'मावळ'वरुन महायुतीत मिठाचा खडा? राष्ट्रवादीच्या जागेवर भाजपचा दावा; आमदार सुनील शेळके आक्रमक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com