Rohit Pawar  SaamTvNews
मुंबई/पुणे

रेटून 'फेकणं' भाजपची सवय; मेट्रो उद्घाटनावरून रोहित पवारांचा हल्लाबोल

भाजप महाराष्ट्र ट्विटरवरून शरद पवार यांच्यावर टीका झाली त्याला रोहित पवार यांनी उत्तर दिले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- रश्मी पुराणिक

मुंबई : पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन झाले. पुणे मेट्रोवरून राज्यात आता श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचे दिसून येत असून युपीए सरकारच्या काळातच मेट्रोला (Pune Metro) मंजुरी मिळाल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांसह काँग्रेसचे नेते सांगत आहेत. याच संदर्भात राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

हे देखील पहा :

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटलं आहे, रेटून ‘फेकणं’ ही भाजपाची नेहमीची सवय असली तरी लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून आणि खोटारड्या भाजपाला आरसा दाखवण्यासाठी 'मेट्रो प्रवासा'चा हा इतिहास मांडावा लागेल. २००९ ला पुणे व पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षाची सत्ता असताना मेट्रोचा प्रस्ताव तयार करण्यात आला.

त्यानंतर राज्यात आघाडी तर केंद्रात UPA सरकार असताना तो मंजुरीसाठी पाठवला आणि महापालिकेत राष्ट्रवादी-काँग्रेसची सत्ता असतानाच मेट्रोचं भूमिपूजन झालं. पण गेल्या पाच वर्षात पुणे मेट्रोच्या ५४ कि.मी.च्या प्रकल्पापैकी ३२ कि.मी.चा पहिला टप्पाही अजून भाजपला पूर्ण करता आला नसल्याचे पवार म्हणाले.

निवडणूक येताच ५ कि.मी.च्या अर्धवट मार्गाचं मेट्रोपेक्षाही सुस्साट वेगाने उद्घाटन केलं. आपण पेट्रोल-डिझेलवर भरमसाठ कर लावून सामान्य माणसाचा खिसा कापला.. तरीही गेल्या ६० वर्षांत विविध सरकारांनी कष्टाने उभ्या केलेल्या संस्था/कंपन्यांची विक्री करावी लागली. हे आपलं कर्तृत्व! असा टोलाही रोहित पवारांनी नरेंद्र मोदींसह भाजपला लगावला आहे. एकूणच आज पुणे मेट्रो प्रकल्पावरून सकाळपासून राज्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका झाली त्याला रोहित पवार यांनी जोरदार उत्तर दिले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनानंतर सोन्याचे दर बदलले, प्रति तोळा इतक्या रूपयांवर पोहचले, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra News Live Update: पीएम मोदींच्या आव्हानानंतर शरद पवारांची पोस्ट

Maharashtra politics : राष्ट्रवादीत 'भूकंप'; पटेल-तटकऱ्यांची पदे कापली? पार्थ आणि जय पवारांची एन्ट्री, सुनेत्रा पवारांचे स्पष्टीकरण

Navi Mumbai Picnic Spot: खारघरचं सेंट्रल पार्क ते बेलापूरचं पारसिक हिल, नवी मुंबईतील ही 5 ठिकाणे पर्यटकांना घालतायेत भुरळ

चुका तुमच्या अन् भुर्दंड जनतेला का? PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे कडाडले

SCROLL FOR NEXT