
बीड : बीडमधील हलगी वादक असणाऱ्या बाळू धुताडमल या तरुणाने, समाजव्यवस्थेने निर्माण केलेल्या भिंतीला चिर देत, अनोखा निर्णय घेतलाय. समाजात नेहमीच हिणवल्या जाणाऱ्या तृतीयपंथीशी (Transgender) विवाह करण्यासाठी बाळू हा तरुण पुढे आलाय. मागील अडीच वर्षांपासून बीडमधील किन्नर सपना आणि बाळू रिलेशनशिप मध्ये आहेत. आता त्यांनी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विवाह करण्याचा निर्णय घेतलाय. तर, आज त्यांचा हळदी समारंभ पार पडलाय. (Beed Transgender Marriage)
हे देखील पहा :
आज-काल अनेक तरुण तरुणी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये (Live In Relationship) राहतात. मात्र, दोघांमधील विचार आणि मतभेदांमुळे त्यांचं हे नातं, काही महिने किंवा वर्षात तुटून गेल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. मात्र, बीडमध्ये (Beed) वास्तव्यास असणारा बाळू धुताडमल हा तरुण किन्नर सपना सोबत गेल्या अडीच वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतोय. तर आता त्यांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतलाय. आज त्यांचा हळदी समारंभ पार पडला असून उद्या म्हणजेच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ते दोघेही विवाह बंधनात अडकणार आहेत.
एकीकडं समाजात तृतीयपंथी व्यक्तींना, त्या समाजाला हिनवले जाते. मात्र, दुसरीकडे बाळूने केलेले हे धाडस, आज समाजात एक नवा आदर्श निर्माण करत आहे. तर आजच्या या हळदी समारंभाच्या निमित्ताने, आनंदाने भारावून गेलेल्या या अनोख्या प्रेमी जोडप्याने, आपला आनंद व्यक्त करत, चांगलाच ठेका धरला. यावेळी हलगी वादक बाळू धुताडमल याने, हलगी वाजवली तर किन्नर सपना हिने यावर चांगलाच ठेका धरला. तर या हळदी समारंभासाठी आलेल्या मंडळींनी त्यांना दाद दिली.
तर, हा अनोखा निर्णय घेणारा बाळू धुताडमल, जागरण गोंधळात हलगी वाजवून आपला उदरनिर्वाह करतो. अशातच त्याची ओळख सपनाशी झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं आणि तब्बल अडीच वर्ष लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहून, त्यांनी आपला संसार फुलवण्याचा निर्णय घेतलाय. रुसव्या फुगव्यातून या दोघांच्या प्रेमाची गोडी अधिक घट्ट झालीय.
आजही किन्नर समाजाला हिनवलं जातं, त्यांना स्वीकारण्यापेक्षा त्यांच्याकडं पाहून नाकं मुरडली जातात. त्यामुळे लग्न करण्याचा पेच या जोडप्या समोर निर्माण झाला आणि चर्चेतून मार्ग काढून अखेर विवाह जुळवण्याचा निर्णय बीडच्या पत्रकार संघाने घेतला. आज दोघांचा हळदी समारंभ पार पडला असून उद्या हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा विवाह होतोय खरा, मात्र किन्नर सपनाला हा समाज महिला म्हणून स्वीकारणार का ? हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.