पुणे: बंदुकीचा धाक दाखवत रोख रक्कमेवर दरोडा ! रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

पुणे: बंदुकीचा धाक दाखवत रोख रक्कमेवर दरोडा !

आळेफाटामध्ये भर लोकवस्तीतील साई इलेक्ट्रॉनिक्स दुकानात चार दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून रोख रक्कम, मोबाईल चोरून नेली असल्याची घटना घडली आहे. हा दरोड्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

रोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

जुन्नर : उत्तर पुणे जिल्ह्यात चोरी दरोड्यांच्या (Robbery) घटना दिवसेंदिवस वाढत असताना आज रात्रीच्या सुमारास जुन्नर (Junnar) तालुक्यातील आळेफाटामध्ये भर लोकवस्तीतील साई इलेक्ट्रॉनिक्स दुकानात चार दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून रोख रक्कम, मोबाईल चोरून नेली असल्याची घटना घडली आहे. हा दरोड्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

हे देखील पहा-

काही दिवसांपूर्वीच शिरुर तालुक्यातील महाराष्ट्र बँक मधील दरोडा नंतर जुन्नरमध्ये अनंत पतसंस्थेवर भर दुपारी दरोडा पडला होता. त्यामध्ये पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र भोर यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा तपास अद्याप सुरूच आहे.

ही घटना ताजी असतानाच आळेफाटा येथे पुन्हा बंदुकीचा धाक दाखवून दरोडा पडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 17 हजार रुपये, ९ हजार किंमतीचा मोबाईल व गाडीची चावी या गोष्टी दरोडेखोरांनी नेल्या आहेत. त्यामुळे अशा दरोड्याच्या घटना रोखण्याचे मोठे आवाहन ग्रामीण पोलिसांसमोर असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंचरच्या रास्तारोकोपूर्वी अमोल कोल्हे आक्रमक; नाफेड खरेदी थेट शेतकऱ्यांकडून करण्याची मागणी

लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते, माजी मंत्र्याचा खळबळजनक दावा, महिलांचे टेंशन वाढले

माजी मुख्यमंत्र्यांच्या चालकाला शिवीगाळ अन् मारहाण; पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा

Latest Alta Design For Feet: पायांचे सौंदर्य खुलवण्यासाठी ट्राय करा अल्ताचे हे ७ लेटेस्ट डिझाइन्स

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तिहेरी अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

SCROLL FOR NEXT