

पुण्यातील बी.जे मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचे रॅगिंग
रॅगिंगला कंटाळून विद्यार्थी बेपत्ता
गेल्या १४ दिवसांपासून विद्यार्थी बेपत्ता आहे
पोलिस त्याचा शोध घेत आहेत
पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बी. जे. मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी रॅगिंगला कंटाळून बेपत्ता झाला आहे. गेले १४ दिवसांपासून हा विद्यार्थी बेपत्ता आहे. याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस या विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तन्मय अजयकुमार वंगे असे बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. पुणे रेल्वे स्टेशनवरून तो निघून गेल्याचे पालकाचे म्हणणे आहे. तन्मय बी. जे. मेडीकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असून तो महाविदयालयाच्या वसतिगृहात रहाण्यास होता. कॉलेजमध्ये त्याच्या बॅचमधील स्थानिक विद्यार्थी ग्रुपकडून मानसिक त्रास, अपमानास्पद वागणूक, टोमणे मारणे, चिडवणे असे प्रकार होत असल्याची तक्रार तन्मयने पालकांडे केली होती.
तन्मयच्या बॅचमधील स्थानिक विद्यार्थी उत्कर्ष सिंग, श्रेया यादव आणि त्याच्या ग्रुपकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून महाविदयालय वसतिगृह सोडून गेल्याची तक्रार तन्मयच्या पालकांनी पुणे पोलिसांकडे केली. योग्य तो तपास करून तसेच दोषी विद्यार्थ्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी त्याच्या पालकांनी केली. तन्मय भेटत नसल्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत.
आमच्या मुलाची कॉलेजमध्ये रॅगिंग झालेली असून सदर त्रासाला कंटाळून तो वसतिगृह आणि कॉलेज सोडून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला असा आरोप तन्मयच्या कुटुंबीयांनी केला. याबाबत बी जे मेडिकल कॉलेजकडून कुठलीही समाधानकारक माहिती दिली जात नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.