नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी अपडेट, १५ लाखांत विकली प्रश्नपत्रिका; नांदगावच्या BAMS च्या विद्यार्थ्याचे कनेक्शन काय?

Shubham Khairnar Detained By Nashik Police: नीट पेपर फुटी प्रकरणात नाशिकच्या शुभम खैरनार या तरुणाला पोलिसांनी अटक केली. या तरुणाने १० लाखांत प्रश्नपत्रिकांची खरेदी करून १५ लाखांत विक्री केली असल्याचे तपासातून उघड झाले आहे.
NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी अपडेट, १५ लाखांत विकली प्रश्नपत्रिका; नांदगावच्या BAMS च्या विद्यार्थ्याचे कनेक्शन काय?
NEET Paper Leak CaseSaam Tv
Published On

Summary:

  • नीट पेपर फुटी प्रकरणात आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर

  • नाशिकमधील बीएएमएस विद्यार्थ्याला ताब्यात

  • १० लाखांत प्रश्नपत्रिकांची खरेदी करून १५ लाखांत विक्री

  • इन्स्टाग्रामवर नीट प्रश्नपत्रिका व्हायरल

  • राजस्थान पोलिसांकडून नीट पेपर लीक प्रकरणाचा तपास सुरू

नीट पेपर फुटीप्रकरणात राजस्थान पोलिसांनी नाशिकच्या तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. नीट पेपर फूट प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण केल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिकमधून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव शुभम खैरनार असं असून त्याने १० लाख रुपयात प्रश्नपत्रिका विकत घेऊन १५ लाख रुपयात विकल्या. त्यानंतर प्रश्न पत्रिका इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती आहे. आरोपीने डोक्यावरील केस कापून पेहराव बदललेला होता तरी देखील पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतलं.

३० वर्षांचा आरोपी शुभम खैरनार मूळचा नांदगाव तालुक्यातील गंगाधरी गावचा असून तो बीएएमसचा विद्यार्थी आहे. तो नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांना देखील काऊंसिलिंग करत होता. नीट पेपर फुटी प्रकरणात नांदगावच्या शुभम खैरनारचे नाव समोर येताच त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला. शुभमच्या वडिलांच्या मते आमचा मुलगा निर्दोष सुटेल. त्याचा या प्रकाराशी काही संबंध नाही. शुभमचे वडील हे पेशाने डॉक्टर असल्याची माहिती आहे.

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी अपडेट, १५ लाखांत विकली प्रश्नपत्रिका; नांदगावच्या BAMS च्या विद्यार्थ्याचे कनेक्शन काय?
NEET UG Exam: मोठी बातमी! नीट पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नाशिकमधून एकाला ताब्यात घेतलं

विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्य घडविण्यासाठी महत्वाची असलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली. नीटचा पेपर लीक झाल्याने ही परीक्षा रद्द झाली. या प्रकरणात शुभम खैरनारला स्थानिक गुन्हे शाखेने जबाबदार धरत ताब्यात घेतले आहे. दरम्यान, याप्रकरणी आमचा मुलगा निर्दोष आहे. गेल्या ६ महिन्यांपासून तो नाशिकमध्ये बीएएमएसची प्रॅक्टीस करत आहे. त्याचा या प्रकरणाशी संबंध नसणार आहे. जरी त्याचे या प्रकरणात नाव येत असेल तर त्याची चौकशी व्हावी अशी प्रतिक्रिया शुभम खैरनारचे वडील डॉ.मधुकर खैरनार यांनी दिली.

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी अपडेट, १५ लाखांत विकली प्रश्नपत्रिका; नांदगावच्या BAMS च्या विद्यार्थ्याचे कनेक्शन काय?
NEET 2026: मोठी बातमी! अखेर 'नीट' परीक्षा रद्द; पेपरफुटीची CBI चौकशी होणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

दरम्यान, नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणामध्ये देशभरातून १६ संशयित आरोपींना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये राज्यातून २ जणांचा समावेश आहे. तपास यंत्रणांनी नाशिकमधून शुभम खैरनारला ताब्यात घेतलं. इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रांचने त्याला ताब्यात घेतलं. त्याला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर दुसरा संशयित आरोपी मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील असून तो सध्या पुण्यात राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी अपडेट, १५ लाखांत विकली प्रश्नपत्रिका; नांदगावच्या BAMS च्या विद्यार्थ्याचे कनेक्शन काय?
NEET UG Exam: नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, देशभरातून १६ संशयितांना ताब्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com