Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Dr D.B Kadam Death : सुप्रसिद्ध डॉ. डी. बी. कदम यांचे दीर्घ आजाराने निधन, वैद्यकीय विश्वात हळहळ

Pune News : पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रख्यात डॉक्टर आणि माजी विभागप्रमुख डॉ. डी. बी. कदम यांचे ६९ व्या वर्षी निधन झाले आहे. कदम यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

Alisha Khedekar

  • बी. जे. मेडिकलचे प्रख्यात डॉक्टर डी. बी. कदम यांचे निधन.

  • नोबल रुग्णालयात दीर्घ आजाराने ६९ व्या वर्षी प्राणज्योत मालवली.

  • डॉ. कदम हे कोविड व स्वाइन फ्लू टास्क फोर्समध्ये योगदान दिलेले अनुभवी तज्ज्ञ होते.

  • डॉ. कदम यांच्या निधनाने वैद्यकीय समाज, विद्यार्थी व रुग्णांमध्ये शोककळा पसरली आहे.

वैद्यकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करणारी दुःखद घटना घडली आहे. बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रख्यात डॉक्टर आणि माजी वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. डीबी कदम यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्र, सहकारी, विद्यार्थी आणि रुग्णांमध्ये तीव्र शोककळा पसरली आहे.

डॉ. डीबी कदम हे १९७४ मध्ये बी.जे. मध्ये वैद्यकीय प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी एमबीबीएस आणि एमडी केले. १९८३ ते २०१७ पर्यंत ते औषधशास्त्रात प्राध्यापक होते आणि संस्थेत विविध भूमिका बजावल्या. ते एक हुशार चिकित्सक, शिक्षणतज्ज्ञ आणि प्रशासक होते. डॉक्टर कदम यांना प्लॅटिनम ज्युबिली एपिकॉन आग्रा २०२० येथे सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता.

डॉ. कदम यांनी निवृत्तीनंतर काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटलचे माजी डीन म्हणून काम केले. तसेच कदम यांनी A(H1N1) (स्वाइन फ्लू) आणि कोविड-19 या दोन्ही साथीच्या काळात मार्गदर्शक तत्त्वे तयार करणाऱ्या अनेक राज्यस्तरीय टास्क फोर्स गटांमध्ये दोनदा काम केले आहे. असंसर्गजन्य आजारांना कसे रोखायचे आणि नियंत्रित कसे करायचे यावरील राज्य तांत्रिक समित्यांमधील प्रमुख सदस्यांपैकी डॉ. कदम एक होते.

दरम्यान काल डॉ. डीबी कदम यांचे नोबल रुग्णालयात दीर्घ आजाराने वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले आहे. डॉ. कदम यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कदम कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Sleeping Tips: उशी घेऊन झोपण्याची सवयी आजपासून सोडा, शरीरात होतील आश्चर्यकारक बदल

Nanded : गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली; पुराच्या पाण्यात तरुण बुडाला

Maharashtra Live News Update: सीना नदीने रौद्ररुप केलं धारण, नांदगाव गावाला बसला पाण्याचा वेढा

Shimla Tourism : हिवाळ्याच्या सुट्टीत शिमला ट्रिप प्लान करताय? मग 'ही' ठिकाणे नक्की पाहा

Bhiwandi Nizampur Municipal Corporation : भिवंडी महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार? मुस्लिम मते गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT