Shocking : प्रेयसीला पाहायला पाहुणे आले, बॉयफ्रेंडची सटकली, असं काही केलं की...
Amravati NewsSaam Tv

Shocking : प्रेयसीला पाहायला पाहुणे आले, बॉयफ्रेंडची सटकली, असं काही केलं की...

Amravati News : अमरावती जिल्ह्यात प्रियसीला मुलगा बघायला आल्याने संतप्त प्रियकराने प्रियसीच्या घरच्यांवर जीवघेणा हल्ला केला आहे. आरोपी फरार असून पोलीस तपास सुरू आहे.
Published on
Summary
  • प्रियसीसाठी कांदेपोह्याचा कार्यक्रम सुरू असताना प्रियकराचा संताप उसळला.

  • प्रियसीच्या घरी रात्री उशिरा प्रियकर व साथीदारांनी घरात घुसून हल्ला केला.

  • मुलीच्या वडिलांसोबत प्रियकराने हाणामारी केली

  • ह्या हल्ल्यात कुटुंबीय जखमी झाले आहेत.

  • या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून प्रियकर आणि त्याचे साथीदार फरार आहेत.

अमरावती जिल्ह्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. लग्नासाठी प्रियसीला मुलगा बघायला आल्याने प्रियकराने प्रियसीच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली असून मुलीच्या कुटुंबाने प्रियकर विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचा या मुलीशी प्रेमसंबंध होते. या काळात काही महिन्यांपूर्वी त्याने तिला सोबत घेऊन थेट तेलंगणात पळ काढला होता. या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणेच्या मदतीने मुलीला सुरक्षित परत आणण्यात आले आणि ती आपल्या आई-वडिलांकडे परतली. यानंतर कुटुंबीयांनी मुलींसाठी स्थळ पाहण्यास सुरुवात केली.

Shocking : प्रेयसीला पाहायला पाहुणे आले, बॉयफ्रेंडची सटकली, असं काही केलं की...
Mumbai News : मुंबईकरांसाठी खूशखबर! महालक्ष्मी यात्रेसाठी बेस्टकडून दररोज २५ अतिरिक्त गाड्या, कधीपर्यंत असणार सेवा?

दरम्यान, काल त्या मुलीसाठी कांदेपोह्यांचा कार्यक्रम योजला होता. या घटनेची माहिती आरोपी प्रियकराला मिळताच तो संतापला. संतापलेला प्रियकर रात्री उशिरा तो आपल्या साथीदारांसोबत मुलीच्या घरी धडकला. त्यावेळी मुलगी, तिचे आई-वडील आणि नातेवाईक घरातच उपस्थित होते. या दरम्यान मुलीच्या वडिलांमध्ये आणि प्रियकरामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र ही शाब्दिक बाचाबाची हाणामारीत बदलली.

Shocking : प्रेयसीला पाहायला पाहुणे आले, बॉयफ्रेंडची सटकली, असं काही केलं की...
Shocking : अरे देवा! गाडीवरून आले, आजूबाजूला पाहिलं; नंतर हळूच सिलिंडर चोरून पळ काढला

या हाणामारीत मुलीचे कुटुंबीय गंभीर जखमी झाले. त्यांनी तडक पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत आरोपी प्रियकर विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ही घटना अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या घटनेप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून आरोपी प्रियकर आणि त्याचे साथीदार अद्यापही बेपत्ता आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com