Mumbai News : मुंबईकरांसाठी खूशखबर! महालक्ष्मी यात्रेसाठी बेस्टकडून दररोज २५ अतिरिक्त गाड्या, कधीपर्यंत असणार सेवा?

Mumbai Best Bus : मुंबईत २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेत भक्तांसाठी बेस्टतर्फे २५ विशेष बससेवा सुरु केल्या जाणार आहेत. भायखळा, महालक्ष्मी स्थानक आणि इतर मार्गांवर जादा बसफेऱ्या उपलब्ध राहतील.
Mumbai News : मुंबईकरांसाठी खूशखबर! महालक्ष्मी यात्रेसाठी बेस्टकडून दररोज २५ अतिरिक्त गाड्या, कधीपर्यंत असणार सेवा?
mumbai NewsSaam Tv
Published On
Summary
  • 'महालक्ष्मी यात्रा' २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे.

  • या यात्रेसाठी बेस्टतर्फे दररोज २५ विशेष बसगाड्या चालवल्या जाणार आहेत.

  • भायखळा व महालक्ष्मी स्थानकाहून मंदिरापर्यंत जादा बससेवा उपलब्ध असेल.

  • प्रवाशांना मदतीसाठी बस निरीक्षक व वाहतूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबईत दरवर्षी साजरी होणारी ‘महालक्ष्मी यात्रा’ यंदा सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे. या यात्रेदरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टतर्फे मुंबई उपनगरातून, तसेच भायखळा, महालक्ष्मी रेल्वेस्थानक येथून महालक्ष्मीदरम्यान २५ विशेष बसगाडया सोडण्यात येणार आहेत. शहराच्या विविध भागांतून महालक्ष्मी मंदिरमार्गे वळविण्यात येणाऱ्या बसमार्गावरील बसफेऱ्यांमध्येही आवश्यकतेप्रमाणे वाढ करण्यात येईल.

महालक्ष्मी देवीचे भक्त मोठ्याप्रमाणावर भायखळा स्थानक आणि महालक्ष्मी स्थानक येथे लोकलने येऊन तेथून बेस्टच्या बसचा लाभ घेतात. त्यामुळे या मार्गावर बेस्ट उपक्रमाच्या जास्तीत जास्त गाड्या भायखळा, महालक्ष्मी स्थानक ते महालक्ष्मी मंदिर या दरम्यान चालवण्यात येतील. भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची बस स्थानकावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Mumbai News : मुंबईकरांसाठी खूशखबर! महालक्ष्मी यात्रेसाठी बेस्टकडून दररोज २५ अतिरिक्त गाड्या, कधीपर्यंत असणार सेवा?
Mumbai News : मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, रात्रीच्या वेळी दुकान फोडणारी टोळी गजाआड, लाखोंचा माल जप्त

महालक्ष्मी बेस्ट बसमार्ग ए-३७, ५७, १५१, ए-६३, ए-७७, ए-७७ जादा, ए-३५७, ८३, ए-१३२ या बसमार्गावर दररोज २५ अतिरिक्त गाडया चालवण्यात येतील. या व्यतिरिक्त रेल्वे प्रवाशांसाठी शिवडीच्या प्रबोधनकार ठाकरे उद्यान येथून महालक्ष्मी मंदिर मार्गे जाण्याकरीता गर्दीच्या वेळी लालबाग, चिंचपोकळी, सातरस्ता व महालक्ष्मी रेल्वे स्थानकमार्गे नवरात्रीच्या ९ दिवसाच्या कालावधीत अधिकच्या विशेष बससेवा चालवण्यात येतील.

Mumbai News : मुंबईकरांसाठी खूशखबर! महालक्ष्मी यात्रेसाठी बेस्टकडून दररोज २५ अतिरिक्त गाड्या, कधीपर्यंत असणार सेवा?
MNS Raj Thackeray : हे हिंदी हवं कशाला? स्टेशनच्या नावावरून राज ठाकरे भडकले, नेमकं काय घडलं ?

महालक्ष्मी यात्रेदरम्यान बेस्ट उपक्रमातर्फे सुरु करण्यात आलेल्या विशेष बससेवेचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. यात्रेनिमित्त जादा बस चालवण्यात येणार असल्याने इतर बस आगारांमधून बसनिरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची तात्पुरत्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

Mumbai News : मुंबईकरांसाठी खूशखबर! महालक्ष्मी यात्रेसाठी बेस्टकडून दररोज २५ अतिरिक्त गाड्या, कधीपर्यंत असणार सेवा?
Mumbai News : देवीची मूर्ती आणायला जाताना आक्रीत घडलं, टँकरने उडवले, भक्ताचा जागीच मृत्यू

'या' मार्गावरून धावणार ‘महालक्ष्मी यात्रा’ विशेष अतिरिक्त गाड्या

  • जे. मेहता मार्ग ते कुर्ला स्थानक (प) या दरम्यान धावणारी बेस्ट बसमार्ग क्रमांक ए-३७ बस

  • वाळकेश्वर ते प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) दरम्यान धावणारी बेस्ट बसमार्ग क्रमांक ५७ बस

  • भायखळा स्थानक (प) ते ब्रीचकॅन्डी रुग्णालय दरम्यान धावणारी बेस्ट बसमार्ग क्रमांक ए-६३ बस

  • भायखळा स्थानक (प) ते ब्रीचकॅन्डी रुग्णालय दरम्यान धावणारी बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-७७ बस

  • संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) ते ब्रीचकॅन्डी रुग्णालय दरम्यान धावणारी बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-७७ जादा बस

  • कुलाबा बसस्थानक ते सांताक्रूझ आगारादरम्यान धावणारी बेस्ट बस मार्ग क्रमांक ८३ बस

  • वडाळा आगार ते ब्रीचकॅन्डी रुग्णालयादरम्यान धावणारी बेस्ट बस मार्ग क्रमांक १५१ बस

  • मुंबई सेंट्रल आगार ते इलेक्ट्रीक हाऊस दरम्यान धावणारी बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-१३२ बस

  • मुंबई सेंट्रल आगार ते शिवाजीनगर आगारादरम्यान धावणारी बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-३५७ बस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com