Mumbai Saam
मुंबई/पुणे

Mumbai Rain: पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! रेल्वे स्थानकावर पाणीच पाणी, लोकल खोळंबली, एक्सप्रेस वेवरही चक्काजाम

Mumbai Rained Out: महाराष्ट्रात मॉन्सूनच्या लवकर आगमनानंतर, मुंबईत सोमवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने सुरूवात केली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Bhagyashree Kamble

राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर आज सकाळपासून मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची बॅटिंग सुरू आहे. वातावरण थंड आणि ढग दाटून आल्यामुळे सर्वत्र काळोख झाला आहे. मात्र, मुंबईकरांना याचा फटका बसत आहे. विशेष म्हणजे कामावर जाणाऱ्या कामगारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं आहे.

गेल्या तासाभरात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत पहाटेपासून संततधार सुरू आहे. यामुळे मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं आहे. रेल्वे ट्र्रॅकवर पाणी साचलं आहे. तर, काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तसेच काही व्यापाऱ्यांचे देखील नुकसान झालं आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाचा सर्वात आधी फटका रेल्वेला बसतो. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचतं. ज्याचा फटका लोकलला बसतो. लोकल सेवा कोलमडली असून, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. सेंट्रल रेल्वेच्या मुख्य मार्गावर धीम्या गाड्या कल्याणकडे ५ मिनिटे उशिराने, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या जलद गाड्या १० मिनिटे उशिराने धावत आहेत. कुर्ला आणि सायन दरम्यान पाणी साचल्यामुळे लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. हार्बर मार्गावरही गाड्या १० मिनिटे उशिराने धावत आहेत.

मस्जिद बंदर स्थानकात सतत पडणाऱ्या पावसामुळे पाणी साचलं आहे. यामुळे लोकल अगदी धीम्या गतीने धावत आहे. यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.कुर्ला, सायन, दादर आणि परळ या भागांमध्येही पाणी साचल्याचे चित्र समोर आले आहे.

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरही प्रवाशांना पावसामुळे फटका बसला आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जोगेश्वरी ते मालाड दरम्यान वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, एलबीएस मार्ग, कुर्ला वेस्ट आणि अंधेरी सबवे येथेही वाहतूक कोंडीची स्थिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT