Rest House: दारूच्या बाटल्या, फाटलेले कपडे अन् कंडोम.. विश्रामगृहात नेत्यांचा रंगीला कारभार

Late-Night Bash in Government Rest House: कांगडा जिल्ह्यातील जवाली येथील जलशक्ती विभागाच्या विश्रामगृहात दारू पार्टी झाल्याचा आरोप काँग्रेसच्या युवा नेत्यांवर करण्यात आला आहे.
Rest House
Rest HouseSaam
Published On

मध्य प्रदेशातील मनोहरलाल धाकड यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता हिमाचल प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कांगडा जिल्ह्यातील जवाली येथे असलेल्या जलशक्ती विभागाच्या विश्रामगृहाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी विश्रामगृहात दारू पार्टी केली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दारू पार्टीसह खोलीत विविध गोष्टी सापडल्या आहेत. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातल्या जवाली येथील जलशक्ती विभागाच्या विश्रामगृहातील असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओतून विश्रामगृहात दारू पार्टी झाली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. व्हिडिओत सोफा दिसत आहे. जो प्रचंड घाण स्थितीत आहे. तसेच दारूच्या बाटल्या, चिकनचे तुकडे, फाटलेले कपडे सर्वत्र पसरलेले दिसत आहे. एवढंच नाही तर, सोफ्यावर कंडोम देखील दिसून येत आहे.

Rest House
Highway Video: नेत्याचा हायवेवरील शरीरसंबंधाचा १ मिनिटाचा VIDEO समोर; अभिनेत्याचं ट्वीट, 'ती' निर्वस्त्र महिला कोण?

दारू पार्टीसह इतरही अयोग्य गोष्टी झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच काँग्रेसच्या काही युवा नेत्यांवर या प्रकरणाच्या संबंधित आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, विश्रामगृह हे पाहुण्यांसाठी आराम करण्यासाठी असते. मात्र, त्या ठिकाणी परवानगी न घेता काँग्रेसचे काही युवा नेत्यांनी राडा केल्याची माहिती समोर आली आहे.

Rest House
Government Scheme: मुलीच्या नावावर ५,००० ₹ गुंतवा, मॅच्युरिटीनंतर मिळतील २७ लाख; सरकारची भन्नाट योजना

घडलेल्या घटनेबाबत अभियंता अजय शर्मा म्हणतात, 'युवक काँग्रेसचे कार्यकर्ते विश्रामगृहात रात्री परवानगीशिवाय घुसले. त्यांनी सुरक्षा रक्षकाला धमकी दिली. त्यांच्या गैरवर्तनामुळे सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी जवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे', असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, यासंदर्भात मंत्र्यांनी देखील गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com