ramdas athawale, maval saam tv
मुंबई/पुणे

Ramdas Athawale News : आम्ही मागून वार करीत नाही, आमची भूमिका स्पष्ट : रामदास आठवले

गायक मिलिंद शिंदे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.

दिलीप कांबळे

Maval News : उद्धव ठाकरे यांना काहीही बोलू द्या पण त्या अगोदर मला त्यांची पोल खोलू द्या. एकनाथ शिंदे यांच्या बद्दल ते काहीही बोलतात. खरी शिवसेना ही शिंदे यांचीच आहे असा निर्णय कोर्टानेही दिला आहे असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नमूद केले. (Maharashtra News)

भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त मंत्री आठवले हे तळेगाव दाभाडे येथे आले होते. त्यावेळेस ते बोलत होते. भारत अखंड ठेवण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने केले आहे. भावा भावामध्ये वाद होत असतात. वाद हे नेहमीच होत असतात. मात्र वाद जरी झाले तरी या देशाचे तुकडे होण्याची वेळ येऊ देणार नाही असेही आठवलेंनी ठामपणे सांगितले.

ते म्हणाले आमच्या शरीराचे तुकडे झाले तरीही देशाचे तुकडे होऊ देणार नाही. आम्ही अतिशय शांतीच्या मार्गाने जाणारे लोक आहेत. सध्या पुण्यामध्ये तलवार गॅंग कोयता गॅंग प्रसिद्ध आहे. एकमेकांवरती कोयते चालवतच असतात. परंतु आम्ही शस्त्र न वापरता शांतीचा मार्ग स्विकारल्याचे आठवलेंनी स्पष्ट केले.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जाणार नाही. बाकी सर्व जातील या दोघांचं सरकार मजबूत आहे. सुप्रीम कोर्टाचा निकालही आमच्याच बाजूला लागणार आहे. दोन हजार चोवीसची निवडणूक आम्हीच जिंकणार आहे असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Infection: शरीराच्या या भागात वेदना होत असेल तर समजा लिव्हर खराब झालंय; इन्फेक्शनचे असतात हे संकेत

Homemade Idli Recipe: घरीच बनवा साऊथ इंडियन स्टाईल इडली, लगेच करा नोट करी ही रेसिपी

Bhau Kadam: 'वडील फक्त रडत होते…', भाऊ कदम यांनी सांगितला ‘तो’ खास भावनिक प्रसंग, म्हणाले- 'आज इतकं नाव कमावलं पण...'

पिंपळे परिवारावर दुखा:चा डोंगर; भाजप आमदाराच्या वडिलांचं निधन; मंत्र्यांकडून शोक व्यक्त

देशात मोठ्या घातपाताचा कट उधळला, डॉक्टराच्या घरातून 300 किलो RDX, एके ४७ अन्...

SCROLL FOR NEXT