Ramdas Athawale News Saam tv
मुंबई/पुणे

Ramdas Athawale News: मी राहुल गांधींचा झेल घेणार, त्यांना शून्यावर बाद करणार; रामदास आठवलेंची जोरदार फटकेबाजी

Ramdas Athawale News: एकीकडे अंतिम सामना सुरु असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधी आणि विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे

Ramdas Athawale News:

विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु आहे. या अंतिम सामन्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. राजकीय नेतेही विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा आनंद लुटत आहे. एकीकडे अंतिम सामना सुरु असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी आणि विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज रविवारी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले,'आजचा दिवस बोलण्याचा नाही. आजचा दिवस मॅच पाहण्याचा आहे. आज मॅच पाहायला गेलो नाही. अहमदाबादमध्ये मॅच पाहण्यापेक्षा पुण्यात पाहण्यात आनंद आहे. मी सेमीफायनलची मॅच पाहण्यासाठी उपस्थित होतो'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आठवले यांनी यावेळी कवितेतून राहुल गांधी आणि विरोधकांवर टीका केली. 'मला इशारा देतं माझं वॉच, रोहित शर्माची टीम घेणार ऑस्ट्रेलियाच्या १० कॅच, का जिंकणार नाही आपण ही मॅच? ही मॅच आपल्याला कोणत्याही परिस्थिती जिंकायची आहे. मोदींच्या टीमनेही चांगली तयारी केली आहे. मी राहुल गांधींचा कॅच घेणार आहे. मी शून्यावर त्यांना आऊट करणार आहे, अशा शब्दात आठवलेंनी विरोधकांना टोला लगावला.

'राजकारणाच्या खेळात तयारी करुन खेळायचं असतं. नरेंद्र मोदी हे अॅक्टिव असणारे खेळाडू आहेत. २०२४ ची चांगली तयारी आहे. आम्ही ३५० रन करणार आहोत. ३५० पेक्षा जास्त रन कराव्या, तुम्ही ३५० केल्या तर आम्ही ४०० रन करू. आम्हाला एनडीएचं सरकार आणायचं आहे, असे आठवले पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT